Pawar gave important committee to Sule : सुप्रिया सुळेंकडे कार्याध्यक्षपदाबरोबर शरद पवारांनी सोपवली सर्वाधिक महत्वाची समिती

सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र, हरयाणा, पंजाब या राज्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे.
Supriya Sule-Sharad Pawar
Supriya Sule-Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाकरी फिरवताना खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यातही सुळे यांच्याकडे पक्षसंघटना स्ट्राँग असलेल्या महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे. याचबरोबर कोणत्याही पक्षसंघटनेत महत्वाचे असलेल्या केंद्रीय निवडणूक अधिकार समितीच्या अध्यक्षपदाची धुराही सुप्रिया सुळे यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत सुळे यांचा वरचष्मा राहणार हे आता स्पष्ट झाले आहे. (Supriya Sule President of Central Election Rights Committee)

सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र, हरयाणा, पंजाब या राज्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे. पक्षाचे सर्वाधिक सक्षम नेटवर्क असलेल्या महाराष्ट्राची जबाबदारीही त्यांच्याकडेच असणार आहे, त्यामुळे एवढे दिवस महाराष्ट्राच्या घडामोडींपासून दूर असलेल्या सुळे या महाराष्ट्रात सक्रीय होण्याची चिन्हे आहेत.

Supriya Sule-Sharad Pawar
NCP News : सुनील तटकरेंनी सांगितले सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेलांना कार्याध्यक्ष नेमण्याचे कारण....

ही तीन राज्ये आणि लोकसभेच्या घडामोडीसोबतच अत्यंत महत्वाचे केंद्रीय निवडणूक अधिकार समितीचे अध्यक्षपदही सुप्रिया सुळे यांच्याकडे देण्यात आलेले आहे. तिकिट वाटपासंदर्भात निर्णय घेणारी ही समिती आहे, त्या समितीचे अध्यक्षपद हे सुळे यांच्याकडे असणार आहे. विविध राज्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत तिकिट वाटपाची जबबादारी ही समिती करत असते.

Supriya Sule-Sharad Pawar
BJP HighCommand suggestion to shinde : मंत्रिमंडळ विस्तारावेळी ‘त्या’ पाच मंत्र्यांना वगळा;भाजप हायकमांडच्या सूचनेने मुख्यमंत्री पेचात

खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड आणि गोव्या राज्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे. याशिवाय राज्यसभेसंदर्भातील निर्णय हे पटेल घेणार आहेत. तसेच, पक्षाच्या आर्थिक व्यवहार समितीचे अध्यक्षपदही पटेल यांना देण्यात आलेले आहे. त्यामुळे पक्षनिधीसाठी पटेल यांची भूमिका महत्वाची ठरली आहे. यापुढेही त्यांना ती बाजू अधिक भक्कमपणे सांभाळावी लागणार आहे.

पटेल, सुळे, यांच्याबरोबर सुनील तटकरेंकडे राष्ट्रीय सरचिटणीसपद आणि ओडिशा आणि पश्चिम बंगाल राज्ये देण्यात आली आहेत. तसेच, जितेंद्र आव्हाड यांनाही राष्ट्रीय स्तरावर प्रोजेक्ट करण्यात आलेले आहे. त्यांच्याकडे बिहार, छत्तीसगड, कर्नाटक आणि जम्मू काश्मीर या राज्यांची जबाबदारी दिली आहे. योगानंद शास्त्री यांच्याकडे दिल्लीच्या प्रदेशाध्यक्षाबरोबरच सेवादलही सोपविण्यात आलेला आहे. के. के. शर्मा यांच्याकडे उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश देण्यात आलेला आहे.

Supriya Sule-Sharad Pawar
Shivsena-BJP Dispute : रवींद्र चव्हाणांची समजूत घालू; श्रीकांत शिंदेंनीही वाद सोडावा,कल्याणमधील वादावर भाजपची प्रतिक्रिया

खासदार मोहम्मद फजल यांना तामिळनाडू, तेलंगणा आणि केरळ राज्याची जबाबदारी दिलेली आहे, तर नरेंद्र वर्मा यांना पूर्वेकडील राज्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. तसेच, मीडिया आणि आयटी विभागही वर्मा यांना सांभाळावा लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com