Sanjay Rathod News : राठोडांच्या मंत्रीपदावर पुन्हा टांगती तलवार : भाजपच्या अहवालाने शिंदेंचीही अडचण, ते प्रकरण पाठ सोडेना

Eknath Shinde News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळातील संजय राठोड यांच्या मंत्रीपदावर दुसऱ्यांदा टागती तलवार आहे.
Sanjay Ratod
Sanjay RatodSarkarnama
Published on
Updated on

BJP News : शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना मंत्रिमंडळामधून वगळा, असा आदेश भाजपश्रेष्ठींनी दिला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी अडचण झाली आहे. बंडाच्या वेळी खंबीरपणे साथ देणाऱ्या सहकाऱ्यांकडून अवघ्या दहा महिन्यांत मंत्रिपद कसे काढून घ्यायचे, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना पडला आहे. या मंत्र्यांमध्ये अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचे नाव येत आहे.

संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या मंत्रीपदावर दुसऱ्यांदा टागती तलवार आहे. कारण ठाकरे सरकारमध्ये संजय राठोड यांना मंत्रिपद सोडावे लागले होते. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामध्ये त्यांच्यावर आरोप झाले होते. त्यामुळे त्यांना तेव्हा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर ते शिंदे यांच्यासोबत गेले. त्यामुळे त्यांना पुन्हा मंत्रिपद मिळाले.

Sanjay Ratod
Sarkarnama Vishesh : मंत्रिपद जाण्याच्या चर्चा सुरु असतानाच सत्तारांचे नवे प्रकरण: स्वत:च बोलून फसले, 'पीए'चा प्रताप...

ठाकरे सरकार असताना पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात भाजपनेच त्यांच्यावर आरोप केले होते. मात्र, शिंदे सरकारमध्ये त्यांना मंत्री केले गेले. त्यामुळे भाजपची कोंडी झाली आहे. अनेक वेळा भाजपला राठोड यांच्याबाबत प्रश्न विचारला जातो. त्यामुळे आता पुन्हा एकदा त्यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार आहे.

दरम्यान, राज्यातील मंत्र्यांच्या कामावर भाजपची (BJP) एक यंत्रणा लक्ष ठेवून आहे. त्या यंत्रणेमार्फत राज्यातील मंत्र्यांचे अहवाल भाजप हायकमांडकडे पाठविले जातात. त्या यंत्रणेकडून दिलेल्या अहवालामध्ये शिंदे गटातील (Eknath Shinde) पाच मंत्र्यांच्या कामाबाबत नकारात्मक उल्लेख असल्याचा दावा केला जात आहे. त्या अहवालाचा आधार घेऊनच भाजपच्या श्रेष्ठींनी शिंदे यांना ही सूचना केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Sanjay Ratod
Chandrashekhar Bawankule News : चंद्रशेखर बावनकुळेंनी हलके केले शिंदेंच्या मंत्र्यांचे टेन्शन; मंत्र्यांबाबतच्या निर्णयावर म्हणाले...

या पाच मंत्र्यांमध्ये आरोग्य मंत्री तानाजी सावंत, कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar), पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या नाव असल्याची चर्चा आहे. या सर्व मंत्र्यांनी बंडाच्या वेळी एकनाथ शिंदे यांना खंबीरपणे साथ दिली. यातील चौघे तर अगोदरच्या सरकारमध्येही मंत्री होते, त्यामुळे त्यांना डावलण्याचा मोठी अवघड कामगिरी शिंदे यांच्यावर येऊन पडली आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com