'हे कुठले घंटाधारी हिंदुत्ववादी...यांचा एकदाच सोक्षमोक्ष लावतो'

लवकरच जाहीर सभा घेऊन नकली हिंदुत्ववाद्यांचा समाचार घेणार : उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

मुंबई : देवळात घंटा बडवणारे हिंदू मला नको आहेत, तर तो अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायाचे. हे कुठले आले घंटाधारी हिंदुत्ववादी. घंटधारी हिंदुत्ववाद्यांनी आम्हा गदाधारी हिंदुत्ववाद्यांना हिंदुत्व शिकवायला जाऊ नये. आमचे हिंदुत्व हे गदाधारी आहे. लवकरात लवकर एक जाहीर सभा घेण्याचा माझा इरादा आहे. काही तकलादू, नकली हिंदुत्ववादी आले आहेत. ‘तेरी कमीज मेरी कमीज से भगवी कैसे’ हा त्यांचा पोटशूळ आहे. या सगळ्यांचा सोक्षमोक्ष मला एकदा लावूनच टाकायचा आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर (BJP) सडकून टीका केली. (Uddhav Thackeray warns BJP on Hindutva issue)

मुंबई महानगरपालिकेचा बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम बेस्टच्या ‘नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड’ एनसीएमसीचे लोकार्पण आज (ता. २५ एप्रिल) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर झालेल्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे बोलत होते.

Uddhav Thackeray
दादागिरी करून याल तर.... : उद्धव ठाकरेंचा राणा दांपत्यास इशारा

मुख्यमंत्री म्हणाले की, सगळे ताळतंत्र सोडून बोलत असतील, तर आपणही बोललं पाहिजे. शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, असे काहीजण म्हणतात. म्हणजे काय सोडलं. हिंदुत्व म्हणजे काय धोतर आहे का. घातलं आणि सोडलं. जे आता आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत, त्यांनी हिंदुत्वासाठी काय केले आहे. जेव्हा बाबरी मशीद पाडली, तेव्हा हे बिळात लपले होते. अयोध्येत राम मंदिर बांधण्याचा निर्णय तुमच्या सरकारने नव्हे; तर सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. ते मंदिर बांधतानासुद्धा तुम्ही लोकांपुढे झोळ्या पसरवल्या आहेत. मग तुमचे हिंदुत्व आहे कुठे, असा सवाल ठाकरे यांनी भाजपला केला.

Uddhav Thackeray
राणेंनी केसरकरांपुढे उभे केले कडवे आव्हान; सावंतवाडीच्या लखमराजेंचा भाजपत प्रवेश

हनुमान चालिसाचे पठण जरूर करा. रामदास स्वामींनीही भीमरूपी महारुद्र लिहून ठेवले आहे. शिवसैनिकांच्या अंगावर आला, तर ते तुम्हालासुद्धा दाखवायला कमी पडणार नाही. कारण, आमचे हिंदुत्व हनुमानाच्या गदेसारखं गदाधारी आहे. लवकरात लवकर एक जाहीर सभा घेण्याचा माझा इरादा आहे. काही तकलादू, नकली हिंदुत्ववादी आले आहेत. त्या सगळ्यांचा सोक्षमोक्ष मला एकदा लावूनच टाकायचाच आहे, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला दिला.

Uddhav Thackeray
हर्षवर्धन पाटलांना आणखी एक धक्का : १५ वर्षांची सत्ता संपुष्टात; भरणे गटाची बाजी!

हनुमान चालिसासाठी आमच्या घरी जरूर या; पण...

हनुमान चालिसा म्हणायाला आमच्या घरी यायचे असेल तर जरूर या. हनुमान चालिसा पठणाची तुमच्या घरात पद्धत नसेल, तुमची संस्कृती नसेल तर आमच्या घरात येऊन जरूर बोला. पण त्याला एक पद्धत असते. ‘साधूसंत येती घरा; तोचि दिवाळी-दसरा,’ अशी एक म्हण आहे. पण आमच्या घरात कायम साधूसंत येत असतात. पण ते नीट बोलून, सांगून येतात. त्यांचे स्वागत आम्ही करतो. पण, दादागिरी करून याल, तर दादागिरी कशी मोडायची, ते पण आम्हाला शिवसेनाप्रमुखांनी शिकवलेले आहे, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com