Vidhansabha Election1962 Flashback: संयुक्त महाराष्ट्रानंतरची पहिलीच निवडणूक, काँग्रेस सत्तेत

Maharashtra Politics : 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि 1962 मध्ये पहिली विधानसभा निवडणूक लागली. या निवडणुकीत काँग्रेससह शेकाप, प्रजा समाजवादी पक्ष, रिपाइं, सप, भाकप हे प्रमुख पक्ष निवडणूक रिंगणात उतरले.
Vidhansabha Election
Vidhansabha Election sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election : 1962 च्या निवडणुकीत 264 जागांसाठी एकूण 1161 उमेदवार निवडणुकीला उभे राहिले. त्यात 1125 पुरुष, 36 महिला तर 437 अपक्ष उमेदवार होते. काँग्रेस, भारतीय जनसंघ, रिपाइं, शेकाप, स्वतंत्र पक्ष, रामराज्य परिषद, हिंदू महासभा, प्रजा समाजवादी पक्ष, सप, भाकप अशा एकूण 10 पक्षांनी आपापले उमेदवार उभे केले.

काँग्रेसनं (Congress) 264 तर शेकापनं 79 जागा लढवल्या. प्रजा समाजवादी पक्षानं 101 तर भाकपनं 56 जागा लढवल्या. रिपाइंनं 66 तर सपनं 14 जागा लढवल्या आणि विधानसभा फ्लॅशबॅक 1962 चा रणसंग्राम सुरू झाला.

264 पैकी 215 जागा मिळवत काँग्रेस सत्तेवर!

निवडणुकीचा निकाल लागला आणि काँग्रेसनं 215 जागांवर विजय मिळवला. शेकापनं 15 जागा जिंकल्या तर प्रजा समाजवादी पक्षाला 09 जागा जिंकता आल्या. भाकपनं 06 तर रिपाइंनं 03 जागी विजय मिळवला. सपला 01 जागा जिंकता आली.

36 पैकी 13 महिला उमेदवार आमदार बनल्या तर 437 अपक्षांपैकी 15 जण आमदार बनले. एकूण 10 पक्षांपैकी 06 पक्षांना जागा जिंकता आल्या तर उर्वरित 04 पक्षांना भोपळाही फोडता आला नाही.

Vidhansabha Election
Asaram Bapu Parole News: ...अखेर 11 वर्षांनंतर पहिल्यांदाच आसाराम बापूंना न्यायालयाकडून जामीन मंजूर, पुण्यात येणार

मुख्यमंत्रिपदी काँग्रेसचे मारोतराव कन्नमवार

1960 मध्ये द्विभाषिक मुंबई प्रांताचं विभाजन होऊन महाराष्ट्र (Maharashtra) आणि गुजरात या दोन नव्या राज्यांची निर्मिती झाली. त्याच वेळी मुंबई प्रांताच्या विधानसभेचंही विभाजन झालं आणि 1960 मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले. भारत-चीन सीमा संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, कृष्ण मेनन यांनी 1962 मध्ये संरक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी यशवंतरावांना संरक्षणमंत्री केलं आणि त्यांच्यानंतर मारोतराव कन्नमवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले.

परंतु, 24 नोव्हेंबर 1963 रोजी मुख्यमंत्रिपदी असतानाच त्यांचं अकाली निधन झालं. कन्नमवार यांच्या आकस्मिक निधनामुळं महाराष्ट्राच्या हंगामी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे बाळासाहेब सावंत यांच्या हाती सोपवण्यात आली. 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 1963 या कालावधीत ते महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री राहिले. त्यानंतर वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले.

Vidhansabha Election
Marathwada Vidhan Sabha Election : ''..तर विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात महायुतीच्या आमदारांना गुलाल लागणार नाही''

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com