Solapur BJP MLA News: दारुबंदीसाठी भाजप आमदाराला महिलांचा पुन्हा घेराव; आमदारांचा थेट एसपींना फोन

BJP MLA Surrounded by Women for Liquor Ban: यापूर्वीही देशमुख यांना दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोळकवठे गावात अवैध हातभट्टी दारू बंद करा, अशी मागणी केली होती.
Subhash Deshmukh
Subhash DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Subhash Deshmukh News : भारती जनता पक्षाचे दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांना पुन्हा एकदा दारुबंदीसाठी महिलांनी घेराव घातला. मतदारसंघाच्या दौऱ्यावर असलेले आमदार देशमुख यांना दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर गावात महिलांनी अडवून गावातील दारुबंदीची मागणी केली. देशमुखांनी महिलांची कैफियत ऐकून थेट सोलापूरचे (ग्रामीण) जिल्हा पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांना फोन लावून मतदार संघातील हातभट्टीची दारू बंद करण्याच्या सूचना दिल्या. (BJP MLA again surrounded by women for liquor ban)

Subhash Deshmukh
Patna Opposition Unity Meeting: 'नीतीशकुमार त्यावेळी कार्यकर्ता होते, आज विरोधी ऐक्याचे यजमान... उत्तम आरंभ...'

आमदार सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांनी दक्षिण सोलापूर मतदार संघात लोकसंवादचा धडका लावला आहे. दक्षिण सोलापूर (Solapur) तालुक्यात अवैध धंद्यांनी जोर धरला आहे. यापूर्वीही देशमुख यांना दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोळकवठे गावात अवैध हातभट्टी दारू बंद करा, अशी मागणी केली होती. भरसभेतून भाजप (BJP)आमदार देशमुख यांनी मंद्रुप पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना कॉल केला होता. दरम्यान, आज दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर गावातील महिलांनी भाजप आमदार सुभाष देशमुखांना अडवून घेराव घालून दारूबंदीची मागणी केली.

Subhash Deshmukh
BRS News : नाना पटोले यांचा बीआरएसवर गंभीर आरोप; 'त्यांचा रेट ठरलेला आहे, त्यांचं सर्वकाही पैशावर चाललंय'

सुभाष देशमुख हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर आणि विंचूर या दोन गावांची भेट घेत परत जात होते. विंचूर गावातील महिलांनी सुभाष देशमुखांचे वाहन अडवून दारू बंदीची मागणी केली. या गावात हातभट्टी दारूची खुलेआम विक्री होत असून येथील पुरुष आणि तरुण मुले हे व्यसनाच्या आहारी जात आहेत. दारु विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी महिलांनी संताप व्यक्त करत आमदार सुभाष देशमुखांना घेरावा घातला.

महिलांच्या संतप्त भावना पाहून अखेर आमदार सुभाष देशमुख यांनी पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांना फोन लावून यासंदर्भात कल्पना दिली. येथील सर्व अवैध धंदे बंद करावेत, अशी सूचना देशमुखांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com