

Maha Kumbh Mela stampede : प्रयागराज महाकुंभ मेळ्यात मौनी अमावस्या निमित्त मंगळवारी रात्री उशीरा 'संगम नोज' परिसरात अचानक चेंगराचेंगरी झाली. सध्या महाकुंभ मेळावा सुरू असून या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना 'संगम नोज' या ठिकाणाचे फार आकर्षण दिसून येत आहे, त्यामुळेच या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. परंतु 'संगम नोज' नेमकं काय आहे आणि याचा शाही आखाड्याशी काय संबंध आहे, याबाबत बहुतांश जणांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
संगम नोज हे ते ठिकाण आहे, जिथे गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती या नद्यांचा संगम होतो. इथे गंगेच पाणी काहीसे मातीमिश्रित, यमुनेचे पाणी निळे दिसून येते. या दोन्ही नद्यांचे पाणी वेगवेगळ्या रंगात स्पष्टपणे आपण बघू शकतो. प्रयागराजमध्ये यमुना गंगेत विलीन होते आणि नंतर मग हा प्रवाह बंगालच्या खाडीपर्यंत पोहचतो. संगमाच्या बरोबर समोर असलेला त्रिकोणीय घाटालाच संगम नोज म्हटले जाते.
संगम नोजच्या ठिकाणी मातीचा काठ असल्याने घाटाचा आकार नेहमीच बदलत असतो आणि हे उतरते बनलेले असते. कुंभ आणि महाकुंभ यासारख्या मोठ्या पर्वानिमित्त हे स्थान शाही स्नानासाठी आखाड्याच्या संतांसाठी आरक्षित केले जाते. या ठिकाणी बॅरिकेड्स लावून सर्वसामान्य भाविकाना प्रवेश बंद केला जातो. संत, महंत येथे धार्मिक अनुष्ठान आणि अमृत स्नान करतात. तर अन्य भाविक संगमाच्या अन्य घाटावर स्नान करत आहेत किंवा बोटीद्वारे मुख्य संगमाच्या ठिकाणापर्यंत जातात.
केवळ महाकुंभच नाही, तर प्रयागराजच्या वार्षिक माघ मेळ्यातही पौष पोर्णिमा, मकर संक्रात, एकादशी, मौनी अमावस्या, वसंत पंचमी, अचला सप्तमी, माघी पोर्णिमा आणि महाशिवरात्री दरम्यान संगम नोज वर संतांचा विशेष मेळा भरतो. तर उर्वरीत दिवसांमध्ये सर्वसाधारण भाविक येथे येवून स्नान करतात.
महाकुंभ मेळ्यातील प्रचंड गर्दी बघता, संगम नोजच्या आसपास अस्थायी संगम घाटाची निर्मिती केली जात आहे. 2019मध्ये यास एवढं विस्तारलं होतं की, प्रत्येक तासाला येथे तब्बल 50 हजार भाविक स्नान करू शकतील. यंदा याची क्षमता वाढवून दोन लाख भाविकांपर्यंत केली गेली आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.