Yogi Adityanath : योगी कसे बनले भाजपचे 'ब्रह्मास्त्र'? ; जिथे घेतल्या सभा तिथे भाजपला झाला फायदा!

Yogi Adityanath Star campaigner of BJP : मागील चार निवडणुकांमधील आकडेवारी देत आहे साक्ष; जाणन घ्या, योगींचा स्ट्राइक रेट काय होता?
PM Narendra Modi, Yogi Adityanath
PM Narendra Modi, Yogi AdityanathSarkarnama
Published on
Updated on

Yogi Adityanath Rally for BJP : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अन् भाजपचे फायर ब्रॅण्ड नेते, स्टार प्रचारकर योगी आदित्यनाथ हे कायमच चर्चेत असतात. त्यांचा चाहतावर्ग केवळ उत्तर प्रदेशातच नाही तर संपूर्ण देशभरात दिसतो. त्यामुळेच भाजपही त्यांना जवळपास प्रत्येक राज्याच्या निवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून पाठवताना दिसते. मुख्यमंत्री योगी देखील ज्या ठिकाणी सभा, रॅली करतात त्या ठिकाणी भाजप आघाडीच्या उमेदवाराला फायदाच होतो अन् विरोधी पक्ष मात्र पुरता घायाळ झालेला दिसतो. योगींच्या सभेमुळे संबंधित मतदारसंघातील संपूर्ण वातावरणच बदलून जाते आणि हे काही आकडेवारीवरूनही स्पष्ट झाले आहे.

योगी आदित्यनाथ(Yogi Adityanath) यांची रॅली, सभा म्हणजेच त्या मतदारसंघात भाजपच्या उमेदवारास जवळपास विजयाचीच खात्री असते. याचे उदाहरण आहे महाराष्ट्र, हरियाणा, काश्मीर निवडणूक. महाराष्ट्र निवडणुकीत बटेंगे तो कटेंगेचा नारा चांगलाच गाजला आणि नंतर मग आलेला निवडणुकीचा निकाल तर सगळ्यांनाच माहीत आहे. याशिवाय जम्मूमध्ये मुख्यमंत्री योगींनी जिथे जिथे प्रचारसभा घेतली तिथे भाजप उमेदवाराचा विजय झालेला दिसून आले. तर हरियाणात भाजपचे कमळ फुलवण्यात योगींचे मोठे योगदान आहे. त्यानंतर आता दिल्लीत त्यांची अग्निपरीक्षा आहे. याच पार्श्वभूमीवर आपण जाणून घेऊयात कोणकोणत्या राज्यात किती जागांवर योगींनी प्रचार केला आणि किती टक्के जागांवर उमेदवारांना विजय मिळाला.

PM Narendra Modi, Yogi Adityanath
T Raja Singh News : ''नागा साधूंना जर 15 मिनिटं दिली, तर हैदराबादेत...'' ; भाजप आमदार टी.राजा यांचं मोठं विधान!

जम्मू-कश्मीर विधानसभा निवडणूक -

मागील वर्षी पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूक(Vidhan sabha Election) आणि पोटनिवडणुकीत योगी आदित्यनाथ यांची झालेल्या रॅली आणि त्यांचा स्ट्राइक रेट जर आपण बघितला तर, जम्मू-काश्मीरमध्ये चार जागांवर प्रचार केला आणि विजयाचा स्ट्राइक रेट 100 टक्के होता. जम्मूमध्ये योगींनी ज्या चार ठिकाणी रॅली केली होती, त्या कठुआ, आरएसपुरा साउथ, रामगढ आणि रामनगर या मतदारसंघांमध्ये भाजपला विजय मिळाला.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक -

तर महाराष्ट्रात 12 मतदारसंघात प्रचार केला आणि तिथे विजयाचा स्ट्राइक रेट 92 टक्के राहिला. महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी 12 विधानसभा मतदारसंघात रॅली केली. त्यापैकी 11 मतदारसंघात भाजपला(BJP) विजय मिळाला, तर केवळ एका जागेवर पराभव पत्कारावा लागला. म्हणजे महाराष्ट्रात योगींचा स्ट्राइक रेट 92 टक्के होता.

PM Narendra Modi, Yogi Adityanath
India Budget Tradition : अर्थसंकल्प सादर करण्याचा दिवस अन् वेळेबाबत इंग्रजांपासूनची परंपरा सर्वप्रथम 'या' अर्थमंत्र्यानी मोडली!

झारखंड अन् हरियाणा विधानसभा निवडणूक -

झारखंडमध्ये योगी आदित्यनात यांनी एकूण 13 विधानसभा जागांवर रॅली केली, ज्यामध्ये 5 जागांवर विजय आणि 8 जागांवर पराभव झाला म्हणजेच स्ट्राइक रेट 38 टक्के राहिला. हरियाणामध्येही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा जलवा दिसला. 14 मतदारसंघात योगींनी प्रचार केला होता. ज्यापैकी 9 जागांवर भाजपला विजय मिळाला, तर पाच जागांवर उमेदवार पराभूत झाला. म्हणजे हरियाणात योगींचा स्ट्राइक रेट 64 टक्के दिसून आला.

दिल्ली विधानसभेसाठी योगीच्या 14 जागांवर रॅली अन् स्ट्राइक रेट? -

ज्याप्रकारे योगींनी निवडणूक निकालात आपले योगदान दिले, त्यामुळे आता सर्वांच्या नजरा योगींकडे लागलेल्या आहेत. भाजपच्या दिल्ली निवडणुकीत योगींच्या विजयाचा स्ट्राइक रेट काय राहील, हे निकालानंतरच समजणार आहे. आता योगींना चार दिवसांत 14 सभा करायच्या आहेत. यामध्ये मतदारांच्या मागणीनुसार बदल होवू शकतो.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com