Army General and DGP : आर्मी जनरल अन् DGP यांचे वेतन, जबाबादरी अन् अधिकार तुम्हाला माहीत आहे का?

Army General and DGP Comparison : जाणून घ्या दोन पदांवरील व्यक्ती कोणाला करतात रिपोर्टिंग अन् कोण आहे जास्त पॉवरफुल
Army General and DGP
Army General and DGPSarkarnama
Published on
Updated on

Who is More Powerful Army General or DGP : देशात आर्मी जनरल व पोलिस विभागात डीजीपीचे पद सर्वात वरिष्ठ व उच्च असते. दोघेही देशाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी काम करतात. परंतु तुम्हाला माहीत आहे की दोघांचीही कार्यशैली भिन्न असते. याचबरोबर Army General of India आणि पोलिस DGP यांच्या अधिकारांमध्येही अंतर आहे. जाणून घेऊयात आर्मी जनरल व डीजीपींचे अधिकार, वेतन, कार्यक्षेत्रासह अन्य सविस्त माहिती.

आर्मी(Army) जनरल हे देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी काम करतात आणि देशाच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर असते. आर्मी जनरल थेट राष्ट्रपती आणि संरक्षण मंत्रालयास रिपोर्ट करतात आणि त्याअंतर्गतच काम करतात.

Army General and DGP
illegal Indian immigrants : आणखी 112 भारतीयांना घेऊन अमेरिकन लष्कारचे तिसरे विमान अमृतसरमध्ये दाखल!

ज्याप्रकारे देशाच्या सुरक्षेसाठी आर्मी जनरल असतात, त्याचप्रकारे एखाद्या राज्याच्या सुरक्षेची जबाबदारी त्या राज्याच्या डीजीपींवर(DGP) असते आणि त्यासाठीच त्यांची नियुक्ती केलेली असते. डीजीपी हे राज्य सरकारला रिपोर्ट करतात. डीजीपी हे राज्यातील अंतर्गत सुरक्षेसाठी काम करतात. राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ते जबाबदार असतात. डीजीपी हे राज्याचे गृह सचिव आणि थेट मुख्यमंत्र्यांना रिपोर्ट करतात.

तशी तरी दोन्ही पदं आपल्या क्षेत्रात अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. मात्र आर्मी जनरल यांना डीजीपीच्या तुलनेत अधिक मानू शकतो. कारण, आर्मी जनरल हे संपूर्ण देशाच्या सुरक्षेसाठी जबाबदार असतात. आर्मी जनरल हे युद्ध, दहशतवाद सारख्या मोठ्या संकटाशी लढण्यातही महत्त्वाची भूमिका निभावतात. याशिवाय डीजीपी हे केवळ एका राज्याची कायदा सुव्यवस्था व सुरक्षेसाठी कार्य करतात. ते राज्यात होणाऱ्या अंतर्गत हालचालींवर लक्ष ठेवण्याचे कार्य करतात.

Army General and DGP
Kolhapur Boundary Expansion : निवडणुकीच्या घोळात कोल्हापूरची हद्दवाढ रखडणार? लोकप्रतिनिधींचा हट्टाहास नडणार!

दोन्ही पदांच्या मासिक वेतनाबाबत बोलायचे झाले तर, यामध्ये फार अंतर नाही. आर्मी जनरल यांचे मासिक वेतन 2.5 लाख असते, तर डीजीपी यांना 2.25 लाख मासिक वेतन मिळते. याचबरोबर दोघांनाही शासकीय निवासस्थान, वाहन, सुरक्षा, मेडिकल, उच्चस्तरीय पेन्शन प्रदान केले जाते. आर्मी जनरल यांना कँटीन सुविधाही प्रदान केली जाते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com