Kolhapur Boundary Expansion : निवडणुकीच्या घोळात कोल्हापूरची हद्दवाढ रखडणार? लोकप्रतिनिधींचा हट्टाहास नडणार!

Kolhapur Municipal Limits : कोल्हापूर शहराची एक इंच देखील हद्दवाढ न झाल्याने शहराच्या विकासावर त्याचा परिणाम झाला आहे.
Kolhapur Boundary
Kolhapur BoundarySarkarnama
Published on
Updated on

Kolhapur City Expansion : कोल्हापूर जिल्ह्यातील वातावरण सध्या कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीवरून चांगलेच तापले आहे. शहरी आणि ग्रामीण असा वाद लोकप्रतिनिधीकडून लावला जात असल्याचा आरोप होत आहे. महानगरपालिकेच्या घोषणेपासून गेल्या 60 ते 70 वर्षांत कोल्हापूर शहराची एक इंच देखील हद्दवाढ न झाल्याने शहराच्या विकासावर त्याचा परिणाम झाला आहे.

राज्य सरकार हद्दवाढीला सकारात्मक असले तरी शहरी-ग्रामीण लोकप्रतिनिधींमध्ये विरोध, समर्थनाचा खेळ सुरू आहे. केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच हद्दवाढीचा विषय समर्थन आणि विरोधाचा भाग बनत आहे. इतकेच नव्हे तर विधानसभा निवडणुकीत(Vidhan sabha Election) एकमेकांच्या गळ्यात गळे घालून उतरलेले आमदार आता या मुद्द्यांवरून आमने-सामने आले आहेत. कोणीही सामंज्यसाची भूमिका घेण्यास तयार नाही.

Kolhapur Boundary
BJP Politics : तिकीटाचंं गाजर.... अन् भाजपनं मंत्री, खासदार,आमदारांसह सगळी यंत्रणाच लावली कामाला...

हद्दवाढीमुळे कोल्हापूर(Kolhapur) शहराचा विकास रखडलेला आहे. मुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील काहीवेळा याबाबत लोकप्रतिनिधींची कानउघडनी केली आहे. मात्र शहरी आणि ग्रामीण लोकप्रतिनिधींमध्येच केवळ स्वतःच्या राजकीय सोयीसाठी हद्द वाढीला विरोध होत असल्याचा प्रकार वारंवार समोर येत आहे. महायुती म्हणून एकत्र लढलेले आणि तत्कालीन सामंजस भूमिका घेऊन यशस्वी झालेले लोकप्रतिनिधी आता या मुद्द्यांवरून आमने-सामने आलेत. विधानसभा निवडणुकीत या प्रश्नाबाबत लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ नेते, प्रचारार्थ आलेले नेते यांनी देखील सोयीस्कररित्या या मुद्द्याला बाजूला ठेवले. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा यावरून वातावरण तापवले जात आहे.

कारण याच मुद्द्याच्या आधारे अनेकांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची काळजी लागली आहे. हद्द वाढ ही होणे गरजेचे आहे. शहरी लोकप्रतिनिधींची मागणी योग्य असली तरी ग्रामीण भागातील जनतेचा विचार करणे देखील महत्त्वाचे आहे. पण वास्तविक पाहता केवळ सोयीच्या राजकारणासाठीच या मुद्द्याला विरोध होताना दिसत आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा शहरी आणि ग्रामीण भागात मोडलेला आहे. तर करवीर विधानसभा मतदारसंघातील काही गावांचा समावेश शहराच्या हद्दवाढीत होणार आहे.

Kolhapur Boundary
Maharashtra Politics : फडणवीस यांच्या नेत्याची हिंदुत्ववादी भूमिका; म्हणाला आम्ही 'ओरिजिनली हिंदू, RSS ने ताकद दिली'

मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा जाणीवपूर्वक तापवला जात आहे का? अशी शंका उपस्थित होत आहे. गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या या निवडणुका कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. महानगरपालिका क्षेत्रातील लोकप्रतिनिधींचे हद्दवाढ केल्यास त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो, या मुद्द्यांवरूनच रणनीती आखणे सुरू आहे.

तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यानंतरच हद्द वाढ बाबतची भूमिका घ्यायची, अशी ग्रामीण लोकप्रतिनिधींची मानसिकता आहे. हद्दवाडीला विरोध केला तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला आपला फायदा होऊ शकतो. हीच मानसिकता नेत्यांची बनली की काय? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com