Balasaheb Thorat News : पटोलेंना आरोपी करणारे थोरात 'या' प्रश्नावर का बोलत नाहीत...

Nana Patole News : बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आरोप केले आहेत.
Balasaheb Thorat News
Balasaheb Thorat NewsSarkarnama

Nana Patole News : आमदार सत्यजीत तांबे यांच्या अपक्ष अर्जापासून सुरु झालेले नाशिक पदवीधर निवडणुकीतील राजकारण आता काँग्रेसचे ज्येष्ट नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या राजीनाम्यावर येवून थांबले आहे. थोरात यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर आरोप केले आहेत. मात्र, थोरात यांच्या आरोपांमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यावरही थोरात यांनी बोलावे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

नाशिक पदवीधरमध्ये एक महिना राजकारण सुरु होते. मात्र, त्यावर निकाल लागेपर्यंत थोरात काहीच बोलले नाही. तसेच डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने (Congress) टिकिट दिलेले असतानाही, त्यांनी अर्ज भरला नाही. त्यांनी सत्यजीत तांबे यांचा अपक्ष अर्ज भरला, यावर थोरात यांनी कोणतीच भूमिका घेतली नाही. त्यावर मात्र, थोरात यांनी मत व्यक्त केले नाही, असेही बोलले जात आहे.

Balasaheb Thorat News
Congress : प्रदेशाध्यक्ष नसतानाही बाळासाहेबांनी मध्यस्थी केली होती, त्यांचा सन्मान झालाच पाहिजे...

सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरल्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. निवडणुकीत भाजपने (BJP) त्यांना छुपा पाठिंबा दिला. तसेच भाजपच्या पाठिंब्यावर सत्यजीत तांबे विजयी झाल्याचे सांगत आहेत. तसेच त्यांना भाजपमध्ये येण्याच्या ऑफर दिल्या जात आहेत. भाजपच्या पाठिंब्याबाबत थोरात यांनी काहीच भूमिका घेतली नाही.

सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. त्यामुळे काँग्रेसने त्यांचे पक्षातून निलंबन केले. त्यानंतरही काँग्रेसची आणि बाळासाहेब थोरात यांची सगळी यंत्रणा सत्यजीत तांबे यांच्यासाठी काम करत होती. मात्र, त्यावरही थोरात यांनी काहीच भूमिका मांडली नाही, अशी चर्चा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे.

Balasaheb Thorat News
Balasaheb Thorat News : थोरांताविषयी इंदुरीकर महाराज असं काय बोलले की त्याची चर्चा रंगलीय

बाळासाहे थोरात यांनी स्वत: फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला होता. त्यात त्यांनी सांगितले होते की, मी पक्षाच्या पातळीवर भूमिका मांडणार आहे. त्यांनी पक्षश्रेष्टींना पत्र पाठवले आणि त्यानंतर लगेच राजीनाम्याचे हत्यार उपसले. हे पक्ष शिस्थित बसते का? असा सवाल उपस्थित होत आहे.

पक्षाची बैठक आहे, त्या बैठकीच्या आधीच थोरात यांनी राजीनामा दिला. बैठकीत भूमिका मांडायला हवी होती, असेही काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे थोरात आणि तांबे यांनी पटोले यांना आरोपी केले आहे. मात्र, या प्रश्नाची उत्तरं कोण देणार असा सवाल काँग्रेसचे कार्यकर्ते करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com