शरद पवारांना खुर्ची का दिली? : संजय राऊतांनी सांगितले कारण...

आपण महाविकास आघाडीचा जो ग्रंथ निर्माण केला आहे, त्याला भगवं कव्हर घालण्याचे काम सुधीर भोंगळे यांनी केले आहे.
sharad Pawar-Sanjay Raut
sharad Pawar-Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मी दिल्लीत ज्येष्ठ नेते शरद पवारांना (sharad pawar) बसायला खुर्ची का दिली, हे समजून घ्यायचे असेल तर त्यांनी पवारांची ६१ भाषणे वाचायली पाहिजेत. जे टीकाकर आहेत, जे विकृतपणे टीका करत होते, त्यांना हे पुस्तक वाचल्यावर कळेल की माझ्यासारख्या सामान्य लेखकाने, पत्रकाराने आणि कार्यकर्त्याने पवारांना खुर्ची का दिली. त्यांचा तो मान आहे. त्यांच्या विद्‌वत्तेचा मान आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay Raut) यांनी टीकाकरांना पुन्हा एकदा सुनावले.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भाषणांचा संग्रह असलेल्या ‘नेमकची बोलणे’ हा ग्रंथ राष्ट्रवादी मासिकाचे संपादक सुधीर भोंगळे यांनी लिहिला आहे. त्याचे प्रकाशन खासदार संजय राऊत, ज्येष्ठ साहित्यीक रंगनाथ पठारे यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते शनिवारी (ता. ११ डिसेंबर) मुंबईत झाले. त्या कार्यक्रमात खासदार राऊत बोलत होते.

sharad Pawar-Sanjay Raut
पवारांनी भाजपबाबत ३० वर्षांपूर्वी मांडलेला विचार आमच्या लक्षात दोन वर्षांपूर्वी आला!

राऊत म्हणाले की, मी दिल्लीत शरद पवारांना बसायला खुर्ची दिली, त्याबद्दल माझ्याबाबत बरंच काही बोललं गेलं. अनेकांनी टिकाटिपण्णी केली. जे विकृतपणे माझ्यावर टीका करत होते, त्यांना हे पुस्तक वाचल्यावर कळेल की पवारांना मी खुर्ची का दिली. त्यांचा तो मान आहे. पण, आपल्या देशात सध्या विकृत राजकारण सुरू आहे, त्याच्यावरसुद्धा पवारांनी २५ ते ३० वर्षांपूर्वी कोरडे ओढले आहेत, हे आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमातून दिसून येते.

sharad Pawar-Sanjay Raut
जयंत पाटील मागच्या रांगेत, तर सुप्रिया सुळे शेवटच्या!

प्रश्न विचारणाऱ्यांचे काय अवस्था आहे, हे आपण पाहतो. पण पवारांचे उलटे आहे, त्यांना प्रश्न विचारलेले आवडतात. त्यांना उत्तर शोधायला आवडतं. आम्ही पत्रकार व नेतेमंडळी पूर्वी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये दररोज भेटायचो, पण आता तसं होत नाही. या देशातील लोकांचा संवाद होता कामा नये, विचाराचे आदानप्रदान होता कामा नये, म्हणून सेंट्रल हॉलमध्ये पत्रकारांना निर्बंध आणले गेले. तेव्हापासून तिकडचा संवाद पूर्णपणे तुटला. त्याच्यावरसुद्धा पवारांनी १९९० मध्ये ही प्रवृत्ती काय आहे यावर मत व्यक्त केले आहे. विचार मांडायचाच नाही, ही प्रवृत्ती झुंडशाही वाढवणारी आहे. या सर्व झुंडशाहीचा आज आपण सर्वजण सामना करत आहोत.

sharad Pawar-Sanjay Raut
‘बबड्या’ जेरबंद असल्याने यंदा ‘डॅडी’चं काय होणार!

राऊत पवारांना म्हणाले, ‘तुमच्या विचाराला भगवं कव्हर घातलं आहे’

तुमच्याच विचाराला भगवं कव्हर घातलं आहे. आपण महाविकास आघाडीचा जो ग्रंथ निर्माण केला आहे, त्याला भगवं कव्हर घालण्याचे काम सुधीर भोंगळे यांनी केले आहे, त्याबद्दल भोंगळे यांना धन्यवाद देत भाषणाच्या पुस्तकाच्या कव्हरच्या भगव्या रंगाकडे पाहत खासदार संजय राऊत यांनी कोटी केली. ते पुढे म्हणाले की, आपण पवारसाहेबांचा विचार कसा पुढे नेत असतो आणि एकमेकांच्या रंगात कसे मिसळत असतो. हे सरकार कसं चाललं आहे, बेरंग झालेला नाही, तर अवघा रंग एकचि झाला आहे, अशा शब्दांत महाविकास आघाडी आजही खंबीरपणे एकत्रित उभी आहे, असे स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com