कलम 370 रद्द करण्यावरून मोहन भागवतांचं मोठं विधान

अजूनही लोकसंख्येचा एक हिस्सा 'आझादी' ची भाषा बोलत आहे, असंही भागवत यांनी म्हटलं आहे.
Mohan Bhagwat
Mohan Bhagwat
Published on
Updated on

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी कलम 370 बाबत मोठं विधान केलं आहे. जम्मू-काश्मीरला (Jammu-kashmir) विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवल्यानंतरही तेथील समस्या पूर्णपणे सुटलेल्या नाहीत, असं ते म्हणाले आहेत. अजूनही लोकसंख्येचा एक हिस्सा 'आझादी' ची भाषा बोलत आहे, असंही भागवत यांनी म्हटलं आहे.

नागपूरात एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. भागवत म्हणाले, नुकताच जम्मू-काश्मीरचा दौरा केला. कलम 370 रद्द करण्यात आलेल्या विकासाचा रस्ता खुला झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले. मागील महिन्यात मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान जम्मू-काश्मीरमधील मुस्लिम विद्यार्थ्यांचे म्हणाले की ते भारतातच राहू इच्छितात. आता ते कोणत्याही अडथळ्यांशिवाय भारतीय म्हणून राहू शकतात.

Mohan Bhagwat
लालुंना मोठा धक्का; पक्षाविरोधात मुलानेच केलं बंड

जम्मू आणि लडाखला पूर्वी भेदभावाचा सामना करावा लागत होता. काश्मीर खोऱ्यात केल्या जाणाऱ्या कामांमधील 80 टक्के हिस्सा स्थानिक नेत्यांच्या खिशात जात होता. लोकांना त्याचा फायदाच मिळत नव्हता, असा आरोपही भागवत यांनी केला. कलम 370 रद्द करण्यात आल्याने आता ही स्थिती बदलली आहे. लोकांच्या आयुष्यात आनंद आला आहे. असं भागवत यांनी नमूद केलं.

आता काश्मीर खोऱ्यातील वातावरण निवळलं आहे. पुढील काळात तिथे निवडणुका होतील आणि नवीन सरकार स्थापन होईल. आपल्या मुलांच्या हातात पुस्तकांऐवजी दगड देणाऱ्या लोकांनी दहशतवाद्यांची प्रशंसा आता बंद केली आहे, असंही भागवत यांनी स्पष्ट केलं.

Mohan Bhagwat
शिवराजसिंह सरकारविरोधात भाजप खासदाराची आघाडी अन् काँग्रेसचाही पाठिंबा

दरम्यान, मागील आठवडभरात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत काश्मीरमध्ये नऊ जवान शहीद झाले आहेत. त्यामध्ये दोन अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. लष्कराकडून दहशतवाद्यांची शोधमोहिम हाती घेण्यात आली आहे. पण दहशतवाद्यांकडून जोरदार प्रतिहल्ला केला जात आहे. दहशतवाद्यांनी मागील 15 दिवसांत सात नागरिकांची हत्याही केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com