Ahilyanagar District Bank News Radhakrishna Vikhe Patil, Chandrashekhar Ghule
Ahilyanagar District Bank News Radhakrishna Vikhe Patil, Chandrashekhar Ghule Sarkarnama

Radhakrishna Vikhe Patil : विखे पाटलांचा नवा राजकीय डाव : अजितदादांचा माजी आमदार जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी

Ahilyanagar District Bank Chandrashekhar Ghule Patil: पालकमंत्री विखे पाटलांनी सुत्रे फिरवत ही निवडणूक बिनविरोध केली. गेल्या वेळी बहुमत नसतानाही विखेंनी आमदार कर्डिले यांना अध्यक्ष करुन दाखवलं होते. आताही त्यांनी सुत्र फिरवत अध्यक्षपदी घुले यांची निवड केली आहे.
Published on

Ahilyanagar District Bank News : अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीमुळे पुन्हा एकदा भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील हेच किंगमेकर ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. विखेंनी यांनी घुले यांना अध्यक्ष करीत राजकीय डाव साधला असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

काल (सोमवारी) अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे चंद्रशेखर घुले यांची बिनविरोध निवड झाली, ही निवड बिनविरोध करण्यात राधाकृष्ण विखे पाटलांनी पुढाकार घेतला होता. बँकेचे अध्यक्ष,आमदार शिवाजी कर्डिले पाटील यांच्या निधनाने अध्यक्षपद रिक्त झाले होते. पालकमंत्री विखे पाटलांनी सुत्रे फिरवत ही निवडणूक बिनविरोध केली. गेल्या वेळी बहुमत नसतानाही विखेंनी आमदार कर्डिले यांना अध्यक्ष करुन दाखवलं होते. आताही त्यांनी सुत्र फिरवत अध्यक्षपदी घुले यांची निवड केली आहे.

घुलें यांना अध्यक्ष करुन विखेंनी पुढील राजकीय डावपेच आखल्याचे बोलले जाते. फेब्रुवारी 2026 मध्ये बँकेची पंचवार्षिक निवडणूक होऊ घातली आहे. पण शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे ही निवडणूक आता घेण्यात आली. तीन महिनेचे घुले हे अध्यक्षपदी राहणार आहे. पण हे तीन महिने आगामी निवडणुकांसाठी महत्वाचे मानले जातात.

फेब्रुवारी 2021 मध्ये झालेली निवडणूक थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र लढवली व बँकेवर वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यावेळी उदय शेळके बँकेचे अध्यक्ष झाले. मात्र अडीच वर्षांमध्ये त्यांचे अकस्मित निधन झाले. त्यानंतर अध्यक्षपदासाठी चंद्रशेखर घुलेंना अध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली. पण थोरात व एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसचे 5 संचालक फुटल्याने चंद्रशेखर घुले यांना पराभव पत्करावा लागला होता.

Ahilyanagar District Bank News Radhakrishna Vikhe Patil, Chandrashekhar Ghule
Latur News: ऐन निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; 11 उमेदवारांनी घेतला मोठा निर्णय

भाजपकडे केवळ सहा सदस्य असतानाही विखे आणि कर्डिले यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आणि स्वतः शिवाजी कर्डिले बँकेचे अध्यक्ष झाले. कर्डिलेंच्या रुपाने बँकेच्या इतिहासात प्रथम भाजपचा अध्यक्ष झाला होता. 10-9 फरकाने कर्डिले विजयी झाले होते. कर्डिले यांच्या निधनानंतर बँकेच्या अध्यक्षपदाची माळ त कुणाच्या गळ्यात घालतात, याकडे सगळ्याचे लक्ष होते.

काल (सोमवारी) सकाळी विखे पाटलांनी नगरमध्ये संचालकांनी बैठक बोलवली. यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार घुले यांच्या नावाला एकमताने मंजुरी देण्यात आली. विखे प्रत्येक चालीतून नवा डाव टाकतात, हे जगजाहीर आहे. आताही जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडीनंतर ते किंगमेकर ठरले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पंचायत समिती, नगरपालिका, महापालिकेत भाजपचाच उमेदवार विजयी होईल, अशी रणनीती विखेंनी आखली असल्याचे यानिमित्ताने दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com