Ram Shinde BJP : 'हमारे अंदर 'राम' भी है, और 'रावण' भी'! भाजपच्या राम शिंदेंच्या पोस्टचा अर्थ काय?

BJP Ram Shinde Facebook Post From Jamkhed Ahead of Mahayuti Cabinet Meeting Sparks Buzz : जामखेड चौंडी इथं महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची होत असलेल्या बैठकीच्या तोंडावर विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदेंनी केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
Ram Shinde BJP 1
Ram Shinde BJP 1Sarkarnama
Published on
Updated on

BJP Maharashtra updates : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्तानं चौंडी (ता. जामखेड) इथं महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक सहा मे रोजी होत आहे. कारण पुढं जयंतीच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आहे. तत्पूर्वी या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

ही बैठक जरी सरकारची असली, तीन तासांची असली, तरी स्थानिक नेते म्हणून, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांची ताकद वाढणार आहे. या बैठकीपूर्वी राम शिंदेंनी कर्जत नगरपंचायतीमध्ये घडवून आणलेलं सत्तांतर, राज्यभरात वाढवलले दौरे, राज्याचे नेते होण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्याशी सुरू असलेला राजकीय संघर्ष, समाज माध्यमांवरील वावर, सर्व कृती चर्चेत आली आहे. यातच आज फेसबुकवर केलेली पोस्टनं खळबळ उडवून दिली आहे.

भाजपच्या (BJP) सभापती राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्यातील राजकीय संघर्ष अहिल्यानगरमधील कर्जत-जामखेड मतदारसंघासह राज्यानं पाहिला आहे. दोन्ही तुल्यबळ नेते एकमेकांना पाण्यात पाहण्याची एकही राजकीय संधी सोडत नाही. राम शिंदेंनी कर्जत नगरपंचायतीमध्ये नुकताच सत्तांतर घडवून आणलं. आमदार रोहित पवार यांची एकहाती असणारी सत्ता राम शिंदेंनी उलथवून लावली.

Ram Shinde BJP 1
Congress CWC Meeting: काँग्रेसची नवी प्रयोगशाळा! कार्यकर्त्यांच्या `फीडबॅक`वर निर्णय घेणार

आता महायुती (Mahayuti) सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक तीन दिवसांनी होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राम शिंदेंनी आपल्या फोटोसह दमदार बॅनर फेसबुक पोस्ट केला आहे. 'हमारे अंदर 'राम' भी है, और 'रावण' भी! तू बता तुझे मिलना किससे है?' असा बॅनरवरील मजकूर आहे. या फोटोखाली टॅगलाईन सगळ्यांनाच संभ्रमात टाकणारी आहे. हा इशारा नेमका कोणाला? यावर आता चर्चा झडत आहे. 'समझने वाले को सिर्फ इशारा काफी है!' हे टाकायला देखील ते विसरले नाहीत.

Ram Shinde BJP 1
Shirdi Saibaba temple threat : शिर्डीचं मंदिर 'पाइप बॉम्ब'ने उडवून देण्याची धमकी; PM मोदींच्या मंत्र्यांनी कालच घेतलं होत साई दर्शन

भाजपकडून शिंदेंना मोठी संधी

राम शिंदेंची वक्तृत्वाची शैली देखील वेगळीच आहे. भाषणातून टीका-टिप्पणी करताना विरोधकांसह पक्षातील कुरघोड्यावर भाष्य करताना भंबेरी उडवून देतात. शाल जोडे मारण्यात ते तरबेज असून वेळ आली की, सर्वांनाच आपल्या टप्प्यात घेतात. विधानसभेत यंदा त्यांचा अल्पमताने पराभव झाला. दुसरा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला. पण भाजपमधील वरिष्ठ नेतृत्वाने त्यांना राजकीय पटलावर मोठी संधी दिली. विधान परिषदेची आमदार की, नंतर सभापती पद बहाल केलं.

शिंदे अन् पवार यांच्यातील राजकीय संघर्ष

राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दोघांनी आरोप-प्रत्यारोप करण्याची एक पण संधी दवडली नाही. त्यात निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी एका चॅनेलच्या कार्यक्रमात आमदार रोहित पवारांनी लायकी शब्दाचा वापर केल्याने राजकीय वातावरण आधिकच तापले होते. राजकीय आरोप-प्रत्यारोपाचा हा भाग म्हणून सर्वांनी सोडून दिले असले, तरी राम शिंदे हा अपमान विसरलेले नाहीत.

राम शिंदेंचा विधानसभेत पराभव

विधानसभेचा निकाल लागला 1 हजार 243 अल्प मतांनी राम शिंदेंचा पराभव आमदार रोहित पवारांकडून झाला. उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा न होणे, काही भागात वातावरण चांगले असताना मते न मिळणे याची कारणमीमांसा झाली. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मैत्री कामाला आली आणि राम शिंदे विधान परिषदेचे सभापती बनले. दौऱ्यात आता सरकारी प्रोटोकॉल आला अन् राम शिंदेंचा लालदिव्याच्या ताफा आता सुसाट सुटला आहे.

सभापती पदाची गरिमा शिकवा

आमदार पवार अन् राम शिंदेंमधला राजकीय संघर्ष अलीकडच्या काळात आणखी तीव्र झाला. सभापती पदाची गरिमा राम शिंदे राखत नाही. कोणीतरी त्यांना तो शिकवावा, असे म्हणत पवारांनी नव्याने शिंदेंना डिवचलं. त्यास काही दिवसाच्या आतच राम शिंदेंनी कर्जत नगरपंचायतीच्या माध्यमातून सत्ता पालट करीत उत्तर दिलं.

पवारांना शिंदेंचा राजकीय धक्का

राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून गणना असलेल्या आमदार पवारांना नगरपंचायतमध्ये सत्तांतर घडवून राम शिंदेंनी मोठा राजकीय धक्का दिला. उपनगराध्यक्ष निवड थोडी कायद्याच्या कचाट्यात सापडली. पण त्यात देखील आपला गट बाजी मारेल, असा विश्वास राम शिंदेंना आहे. या सर्व घडामोडीत शनिवारी त्यांच्या नवीन राजकीय पोस्टने आणखी एक धुरळा उडवला.

फडणवीसांचे शिंदेंना बळ

आपल्या फेसबुक अकाउंटवरून 'हमारे अंदर 'राम' भी है, और 'रावण' भी! तू बता तुझे मिलना किससे है?' या आशय अन् फोटोसह केलेली पोस्ट राजकीय विरोधकांना की, पक्षातील अंतर्गत गटबाजीला खतपाणी घालणाऱ्यांना इशारा आहे का, याची चर्चा थांबायला तयार नाही. अहिल्यानगर जिल्ह्यात भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी सुरू असलेल्या पक्षांतर्गत असलेल्या संघर्ष सर्वश्रुत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राम शिंदेंना बळ असल्याने मंत्री विखे पाटलांविरोधातील राजकीय संघर्षात शिंदे वरचढच दिसतात. राम शिंदेंनी या पोस्टमधून एका दगडात अनेक पक्षी टिपलेत, हे मात्र नक्की!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com