Vikhe Vs Thorat : टोकाचा राजकीय संघर्ष तरीही विखे-थोरातांनी पाळले भाषचे पथ्य; काय आहे कारण ?

Maharashtra Politics : हमरीतुमरी टाळून टोले, टोमणे, फिरकीतून घेतला एकमेकांचा समाचार
Balasaheb Thorat, Radhakrishna Vikhe Patil
Balasaheb Thorat, Radhakrishna Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Political News : नगर जिल्ह्यातील राजकारण असो वा राज्यातील सत्ताकारण, राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांचा राजकीय संघर्ष हा नेहमीच टोकाचा आणि एकमेकांच्या जिरवाजीरवीचा राहिला. हा संघर्ष वास्तवात आणि भाषणे वा माध्यमातून टोकाचा असला तरी विखे-थोरात यांनी राजकीय सभ्यता पाळल्याचेही वारंवार स्पष्ट झाले आहे. त्यांनी कधीही हमरीतुमरी करून भाषेची मर्यादा ओलांडली नाही. टीकाटिप्पणी, टोले-टोमणे, फिरकी घेत त्यांनी एकमेकांचा समाचार घेतात. नगरमधील या दोघांच्या संघर्षाला खुमासदार किनार राहिल्याने महाराष्ट्रातील राजकीय सभ्यतेची झालर नेहमी दिसून आली. (Latest Political News)

विखे-थोरातांचे शिर्डी-संगमनेर विधानसभा मतदारसंघ शेजारी-शेजारी. या अर्थाने दोघेही सख्खे शेजारी आणि पक्के राजकीय वैरी. राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) लोणीचे तर थोरात जोर्वे गावचे. दोन्ही गावात काही किलोमीटरचे अंतर. गंमत म्हणजे थोरातांचे जोर्वे गाव संगमनेर तालुक्यात असले तरी विखेंच्या शिर्डी मतदारसंघाला जोडले गेलेले आहे. साहजिकच दोन्ही नेते एकमेकांच्या होमपीचवर राजकीय, सामाजिक आणि लग्न व इतर समारंभात अनेकदा एकत्र येतात. अनेकदा अशा कार्यक्रमात शेजारी-शेजारी बसून गप्पाही मारतात. कीर्तन सोहळ्यात एकत्र फुगडीही खेळतात. मात्र वेळ आली तर दोघेही एकमेकांचे आपल्या खास शैलीत वाभाडेही काढतात.

Balasaheb Thorat, Radhakrishna Vikhe Patil
Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तरुणांचे मुंडन आंदोलन

विखे हे थोरातांच्या संगमनेरमध्ये एका धार्मिक दर्ग्यावर चादर चढविण्यासाठी आले होते. यावेळी समर्थकांनी विखे 2024 ला मुख्यमंत्री व्हावेत म्हणून, दर्ग्यात प्रार्थना केली. यावेळी विखेंच्या चेहऱ्यावरील समाधानाचे हास्य लक्षवेधक होते. विखेंनी यावेळी उत्स्फूर्त भाषणात शेरोशायरीही केली. "सुना है आजकल दुष्मनों की गली मे मातम है, लो हम आ गये विकास का सूरज रोशन करने," अशी कोटी करत विखेंनी थोरातांवर निशाणा साधला. यावर लागलीच थोरतांनीही, 'त्यांनी यानिमित्ताने त्यांच्या बरोबर माझीही प्रसिद्धी केली. आजकाल भावी मुख्यमंत्र्यांचे मोठे पेव राज्यात आले आहे,' अशी खोचक टीका करून बाळासाहेब थोरातांनी (Balasaheb Thorat), विखेंची परतफेड केली. एकूणच विखे-थोरतांचा हा नेहमीच चालत आलेला राजकीय सामना येत्या निवडणुकांच्या निमित्ताने अजून रंगणार असल्याचीच चिन्ह आहेत.

दरम्यान, राज्यात मुख्यमंत्री पदाच्या बदलाची चर्चा सुरू व्हावी, आणि भावी मुख्यमंत्री म्हणून विखे परिवाराची चर्चा नसावी, असे राजकारणात कधी झाले नाही. दिवंगत बाळासाहेब विखे यांच्या हयातीत आणि त्यानंतर राधाकृष्ण विखे या पिता-पुत्रांची नावे ते काँग्रेस पक्षात असताना प्रत्येक मुख्यमंत्री बदला वेळी नेहमीच चर्चेत राहिली. अर्थात हे सौभाग्य काँग्रेस पक्षात असताना ना बाळासाहेब विखेंना लाभले ना राधाकृष्ण विखे यांना. आता 2019 ला राधाकृष्ण विखे काँग्रेस सोडून भाजपात आले आहेत. महसूलसारखे मंत्रिमंडळातील महत्त्वाचे खाते त्यांच्याकडे आहे. मात्र भाजपात आल्यानंतरही विखेंचे नाव या ना त्याकारणाने भावी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत कायम आहेच.

(Edited by Sunil Dhumal)

Balasaheb Thorat, Radhakrishna Vikhe Patil
Jitendra Awhad News : 'जितेंद्र आव्हाडांचे मराठा आंदोलनात दंगे पेटवण्याचे...'; शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com