शशिकलांच्या कमबॅकने हादरलेले अण्णाद्रमुकचे नेते म्हणतात...

तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला यांनी राजकारणासह सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेतली आहे.
V.K. Sasikala
V.K. Sasikala

चेन्नई : तमिळनाडूच्या (Tamil Nadu) माजी मुख्यमंत्री जयललिला (Jayalalithaa) यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला (V.K.Sasikala) यांनी राजकारणासह सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेतली आहे. परंतु, शशिकलांनी आज सगळ्यांनाच मोठा धक्का दिला. त्या थेट आज जयललितांच्या स्मृतिस्थळी पोचल्या. तेथे साश्रूनयनांनी त्यांनी आपल्या मैत्रिणीला आदरांजली वाहिली. यामुळे अण्णाद्रमुकमध्ये (AIADMK) अस्वस्थता पसरली असून, पक्षाच्या नेत्यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

जयललिता या पुन्हा एकदा पक्ष ताब्यात घेतील, अशी शक्यता आहे. त्यांना पक्षातून मिळणारा पाठिंबा वाढू लागला आहे. यातच आज त्यांनी एकप्रकार शक्तिप्रदर्शन करीत कमबॅकचे संकेत दिले आहेत. यामुळे अण्णाद्रमुकमधील नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकरल्याचे मानले जात आहे. याबाबत बोलताना अण्णाद्रमुकचे प्रवक्ते व माजी मंत्री डी.जयकुमार म्हणाले की, अण्णाद्रमुकमध्ये शशिकलांना कोणतेही स्थान नाही. अम्मांच्या स्मारकाला त्यांनी भेट दिल्याचा कोणताही राजकीय परिणाम होणार नाही. जयललितांमुळे मोठ्या झालेल्या व्यक्तींपैकी त्या एक आहेत. त्यांना राजकारणात स्थान हवे असेल तर त्यांच्यासाठी एएमएमके हाच पक्ष योग्य आहे. शशिकलांना अभियनासाठी ऑस्कर मिळू शकेल पण द्रमुकमध्ये जागा मिळणार नाही.

V.K. Sasikala
काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्याची पुन्हा जोरदार मागणी अन् राहुल गांधी म्हणाले...

विशेष म्हणजे अण्णाद्रमुक पक्षाचा सुवर्णमहोत्सव उद्यापासून (ता.17) साजरा होत आहे. त्याआधी एक दिवस आधीच आज अण्णाद्रमुकचा ध्वज लावलेल्या मोटारीतून शशिकला या मरिना बीचवर पोचल्या. त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. त्यांना जयललितांसोहत माजी मुख्यमंत्री एम.जी.रामचंद्रमन आणि अण्णादुराई यांच्या स्मारकालाही भेट देऊन आदरांजली वाहिली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात अण्णाद्रमुकचे कार्यकर्ते उपस्थित होते. शशिकला या पुन्हा राजकारणात सक्रिय होत असल्याचे संकेत त्यांना आज दिले आहेत, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. शशिकला यांनी 3 मार्चला राजकारणातून निवृत्ती घेतली होती.

V.K. Sasikala
शिवराजसिंह सरकारविरोधात भाजप खासदाराची आघाडी अन् काँग्रेसचाही पाठिंबा

एमजीआर आणि जयललिता हे कार्यकर्ते आणि पक्षाला वाचवतील, याचा मला विश्वास आहे. पक्षाला चांगले भविष्य आहे. माझ्या हृदयातील सर्व ओझे मी अम्मांच्या स्मृतिस्थळी उतरवून आले आहे, असे शशिकला या जयललिताच्या स्मारकाला भेट दिल्यानंतर म्हणाल्या. राज्यात द्रमुकची सत्ता येण्यास मदत केल्याचा ठपका आपल्यावर ठेवला जाऊ नये, यासाठी शशिकलांनी निवृत्तीचा निर्णय घेतल्याचे बोलले जात होते. आता त्या पुन्हा एकदा पक्षावर दावा सांगण्यास पुढे सरसावल्याचे मानले जात आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी शिक्षा भोगून कारागृहातून बाहेर पडल्यानंतर शशिकलांनी जयललितांच्या स्मृतिस्थळी भेट दिली होती. त्यानंतर आज त्यांनी दुसऱ्यांदा ही भेट दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com