असाही अनोखा योग : देशाची सुरक्षा दोन मराठी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर

एकाचवेळी लष्करप्रमुख आणि हवाई दल प्रमुख म्हणून मराठी व्यक्ती असणार आहेत.
Air Chief Marshal VR Chaudhary and  Army Chief General Manoj Naravane.
Air Chief Marshal VR Chaudhary and Army Chief General Manoj Naravane.

नवी दिल्ली : देशाचे नवे हवाई दल प्रमुख म्हणून एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी गुरूवारी पदभार स्वीकारला आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. एकाचवेळी लष्करप्रमुख आणि हवाई दल प्रमुख म्हणून मराठी व्यक्ती असणार आहेत. सध्या देशाचे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे हे आहेत.

देशाच्या संरक्षणाची जबाबदारी दोन मराठी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर असण्याचा अनोखा योगायोग जुळून आला आहे. नांदेडचे सुपूत्र असलेल्या चौधरी यानी आर. के. एस. भदौरीया यांच्याकडून हवाई दल प्रमुख पदाचा कार्यभार हाती घेतला आहे. नांदेडमधील हदगाव तालुक्यातील हस्तरा या गावचे ते मुळ रहिवाशी आहेत. त्यांच्या आई शिक्षिका होत्या. वडील हैदराबाद येथील भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड या कंपनीत काम करत होते. तिथेच ते स्थायिक झाले होते.

Air Chief Marshal VR Chaudhary and  Army Chief General Manoj Naravane.
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांना फोडण्यात प्रशांत किशोर यांचा मोठा हात!

चौधरी यांचे शालेय शिक्षण नांदेडमधील जिल्हा परिषद शाळेत झाले आहे. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्विसेस स्टाफ काँलेज येथून शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते हवाई दलाच्या फायटर स्ट्रीममध्ये रूजू झाले. त्यानंतर आतापर्यंत त्यांनी अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे. परम सेवा पदक, अति विशिष्ठ सेवा पदक आणि वायु सेना पदकासह अनेक पदके व सन्मान त्यांना मिळाले आहेत.

चौधरी यांच्याकडे 3800 तासांपेक्षा अधिक विविध प्रकारची लढाऊ आणि प्रशिक्षण विमाने उडविण्याचा अनुभव आहे. चौधरी हे ऑगस्ट 2020 पासून हवाई दलाच्या वेस्टर्न कमांडची जबाबदारी सांभाळत आहेत. लडाख सीमेवर हवाई सुरक्षेची महत्वाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली आहे.

Air Chief Marshal VR Chaudhary and  Army Chief General Manoj Naravane.
मोदी सत्तेत आल्यापासून 177 आमदार-खासदारांचा काँग्रेसला रामराम

लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे हे मूळचे पुण्याचे आहे. त्यांचे शालेय शिक्षण पुण्यातच झाले आहे. महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत पुढील शिक्षण पूर्ण केले. 1980 मध्य ते लष्करात दाखल झाले. त्यांनी 31 डिसेंबर 2019 रोजी लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे. ते देशाचे 28 वे लष्करप्रमुख आहेत. पदभार स्वीकारल्यापासून दोन वर्ष चार महिने ते या पदावर राहणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com