Nana Patole : नाना तुमचे चुकलेच,पण....!

BJP Politics : अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांचे व्हेंटिलेटर काढण्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. पण, तत्पुर्वी अमोल मिटकरी यांनी देखील धोत्रेंवर टिका केली पण, ते मात्र अनुप धोत्रेंचा अर्ज दाखल करताना सोबत होते.
Nana Patole, Anup Dhotre filed nomination.
Nana Patole, Anup Dhotre filed nomination.Sarkarnama

Akola Loksabha Election 2024 : काँग्रेस पक्ष एकिकडे दिल्लीत ‘न्यायपत्र’ जाहीर करतो आणि दुसरीकडे त्यांचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भर सभेत एका खासदाराच्या ‘मृत्यूची कामना’ करतात ?. असंवेदनशीलतेचा हा कहर आहे. निवडणुकीत आपण विरोधक असलो तरी विरोधकांच्या मृत्यूची कामना, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्र आणि अकोल्यातील जनतेची नाना पटोले यांनी तत्काळ माफी मागा. खा. संजय धोत्रे जी यांना दीर्घायुष्य लाभावे अशी प्रार्थना भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. पण, असे करताना संजय धोत्रेंवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील टिका केली होती. त्यांनी देखील माफी मागावी अशी भावना भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केली होती. पण, मिटकरी यांना सोबत घेत भाजप ने अनुप धोत्रे यांचा अर्ज दाखल केला. त्यामुळे राजकारणातील आरोप प्रत्यारोप हा पोरखेळ झाला असुन सामान्य मतदार आणि अकोलेकर मात्र पोरके झाल्याचे चित्र आहे.

कुणाचे मरण चिंतू नये, असे म्हणतात ते खरच बरोबर आहे. अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांना दीर्घायुष्य लाभो, अशी भाजप नेत्यांनी केलेली प्रार्थना खरोखरच फळावी. नाना पटोले यांनी भाजप खासदार संजय धोत्रे यांचे व्हेंटिलेटर काढण्याचा भाषणातील रोख एकप्रकारे कुणावर तरी गंभीर आरोप करणारा आहे. मुळात संजय धोत्रे सध्या व्हेंटिलेटरवर आहेत काय, आणि असतील तर त्यांचे व्हेंटिलेटर काढणार आहे, अशी माहिती नाना पटोले यांना कोणी दिली याचा ही शोध घेण्याची गरज आहे. कारण, कुणाचे व्हेंटिलेटर काढणे म्हणजे थेट हत्येचा गुन्हा करण्यासारखे कृत्य आहे. याची माहिती नाना पटोले यांना असणे याचा उलगडा होण्याची गरज आहे. हा केवळ प्रचार सभेतील आरोप नाही तर, यामागे कोण आहे, याचा ही तपशील जाहिर होण्याची गरज आहे. भाजपच्या अकोल्यातील नेत्यांनी या विषयावर चुप्पी साधली असुन अद्याप पर्यंत कुठलाही खुलासा स्थानिक भाजपने का केला नाही. असा प्रश्न उपस्थित होतो.(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nana Patole, Anup Dhotre filed nomination.
Baramati Lok Sabha Constituency : हर्षवर्धन पाटलांची नेमकी सल कोणती? फडणवीसांसमोरच बोलून दाखवली

खासदार संजय धोत्रे यांच्याविषयी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर आरोप करत भाजप परिवारालाच एक प्रकारे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. नाना पटोले यांना अगदी व्हेंटिलेटर काढण्यापर्यंतची इंत्यभूत माहिती कोणी दिली याचा ही शोध घेण्याची गरज आहे. राजकीय गदारोळ, आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असताना अतिशय गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला आहे. या विषयावर सखोल चौकशी होण्याची गरज आहे. खासदार संजय धोत्रे यांच्या व्हेंटिलेटर काढण्यापर्यंत कोणाची मजल जर जात असेल तर रुग्णालयात, हाॅस्पाटीलमध्ये सामान्यांचे व्हेंटिलेटर कसे काढले जातात, याचा मोठा खुलासाच एक प्रकारे नाना पटोले यांनी केला आहे. आरोग्य यंत्रणेला, व्यवस्थेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा हा गंभीर प्रकार आहे. या सर्व प्रकरणात नाना पटोले यांनी देखील सविस्तर खुलासा करण्याची गरज अकोलेकरांद्वारे व्यक्त केली जात आहे.

लोकसभा निवडणुक 2019 नंतर खासदार संजय धोत्रे हे केंद्रात राज्यमंत्री होते. त्याच्या प्रकृती कारणामुळेच त्यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला. गेल्या तीन ते चार वर्षापासुन खासदार संजय धोत्रे यांच्यावर आधी एम्स, मग अकोल्यातील रुग्णालय आणि नंतर संजय धोत्रे यांच्या राहत्या घरी त्यांच्यावर बंद खोलीत उपचार करण्यात येत आहे. अतिशय दुर्धर आजाराने ते ग्रस्त आहे. अकोल्यात बड्या नेत्यांचा दौऱ्यात संजय धोत्रे यांच्या घरची भेट ठरलेली असते. पण, गेल्या तीन ते चार वर्षात त्यांचा सक्रिय राजकारणातील फोटो घराबाहेर आला नाही. त्यांच्या प्रकृतीबद्दल कधी ही जाहिरपणे भाजप नेत्यांनी, धोत्रे परिवाराने अकोलेकरांना काहीच सांगितले नाही. त्यामुळे नेमके कोणता आजार धोत्रे यांना झाला याचा खुलासा झाला नाही. पण, नाना पटोले यांच्या व्हेंटिलेटर काढण्याचा उल्लेखाने या सर्व प्रश्नांना जन्म दिला आहे.

तीन ते चार वर्षे लोकसभेचे खासदार हे अकोल्याचे प्रतिनिधी म्हणुन समोर आले नाही. त्यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे त्यांनी राजीनामा देण्याची गरज होती, असे अनेकांना वाटते. अकोला लोकसभा मतदार संघातील लाखो मतदारांचे प्रतिनिधीत्व करणारे संजय धोत्रे हे प्रकृती कारणाने सक्रिय राजकारणात नसताना त्यांनी स्वतः किंवा भाजपने अकोल्यातील जनतेसाठी कुठलीही स्वतंत्र व्यवस्था उभी केली नाही. नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा यामुळे झाला नाही. देश पातळीवर लोकसभेत अकोल्यातील शेतकरी, उद्योजक, व्यापारी, रस्ते संदर्भातील प्रश्नांना वाचा फोडल्या गेली नाही. त्यामुळेच अकोल्यातील अकोट - अकोला रस्ता, पालखी मार्ग, विविध उड्डाणपुल प्रलंबित असल्याची ओरड होत आहे. संजय धोत्रे यांच्या आजारपणाचे कारण पुढे करत एक प्रकारे भाजपने अकोल्यातील लाखो लोकांसोबत अन्याय केल्याची भावना लोकांमध्ये आहे. अनेक स्वपक्षीय राजकीय नेते असोत की विरोधातील राजकीय नेते असो त्यांनी अनेकदा या विषयावर टिका केली आहे. अगदी खुद्द भाजपचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी गेल्यावर्षी या विषयीची टिका केली होती.

'मागील चार वर्षांपासून अकोला जिल्ह्यातील एकही प्रश्न लोकसभेमध्ये नाही, ही आमच्या जिल्ह्याची शोकांतिका म्हणावी की आमचाच करंटेपणा ?' असा प्रश्न करीत राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रवक्ते तथा आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपा खासदार संजय धोत्रेंवर निशाणा साधला होता. विशेष म्हणजे मिटकरी सत्तेत सहभागी असतानाही त्यांनी भाजपा खासदारांवर टीका केल्याचे चित्र होते. जिल्ह्याचा नागरिक म्हणून आपण खंत व्यक्त केल्याचे मिटकरी यांनी सांगितले होते. गेल्या चार वर्षांपासून जिल्ह्यातील कुठल्याही समस्या लोकसभेत मांडल्या गेल्या नाहीत, याची खंत असल्याने अकोला जिल्ह्यातील नागरिक या नात्याने ट्विट करून भावना व्यक्त केल्या होत्या. हे वास्तव आहे. संपूर्ण देश, राज्यातील प्रश्न संसदेच्या पटलावर येताना दिसतात. दुर्दैवाने अकोला जिल्ह्यातील प्रश्नांना लोकसभेत वाचा फुटताना दिसत नाही. याचे कारण खासदारांचे आजारपण आहे. भाजपाने दुसऱ्याला संधी द्यायला हवी होती. असे ही मिटकरी यांनी म्हटले होते. मागील चार वर्षात अकोला जिल्ह्यातील एकही प्रश्न लोकसभेमध्ये नाही ही आमच्या जिल्ह्याची शोकांतिका म्हणावी की आमचाच करंटेपणा ? अशी विचारणा मिटकरी यांनी केली होती. मिटकरी यांना अनुप धोत्रे यांच्या अर्ज दाखल करताना उपस्थिती होती. भाजप च्या निमंत्रणावरुनच मिटकरी तिथे गेले असतील.

आमदार अमोल मिटकरी यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपने त्यावेळी केली होती. आज देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माफी मागावी अशीच मागणी भाजपची आहेच. पण, गेल्या तीन चार वर्षात अकोल्यातील सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फुटली नाही या बद्दल भाजप चे नेते एक शब्द काढत नाही. अकोल्यातील जनतेला भाजप नेत्यांनी गृहित धरल्याचे चित्र असल्याने मिटकरींच्या भाषेत ही 'शोकांतिका' आहे. तर अकोल्यातील सामान्य जनतेचा 'करंटेपणा' आहे, असे म्हणणारे अमोल मिटकरी अनुप धोत्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या रॅलीत सहभागी होतात. इतकेच नाही लोकसभा निवडणुक 2024 साठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अनुप धोत्रे यांच्यासोबत अर्ज दाखल करताना उपस्थित असतात. राजकीय नेते मंडळी एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप करतात. पण, सामान्य मतदार मात्र कायम उपेक्षित राहतो, त्याचे प्रश्न, त्याच्या समस्या मात्र जैसे थे असतात.

Nana Patole, Anup Dhotre filed nomination.
Loksabha Election 2024 : महायुतीने उमेदवारी कापली,मातोश्रीचे दरवाजे बंद...; आता 'यांचे' काय होणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com