Baramati Lok Sabha Constituency : हर्षवर्धन पाटलांची नेमकी सल काय? फडणवीसांसमोरच बोलून दाखवली

Harshvardhan Patil And Devendra Fadnavis : बारामतीतील बंडाळी शांत करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी लक्ष घातले आहे. त्यांनी इंदापूरमध्ये जाऊन भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी पटलांनी इंदापुरातील भाजपच्या कार्यकर्त्यांवर होणाऱ्या अन्यायाचा पाढाच वाचला.
Devendra Fadnavis, Harshvardhan Patil
Devendra Fadnavis, Harshvardhan PatilSarkarnama
Published on
Updated on

Indapur Political News : गेल्या दहा वर्षांपासून कुठलेही संविधानिक पद नसल्याने इंदापुरातील भाजप कार्यकर्त्यांवर उघडपणे अन्याय होतो. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तालुक्यातील भाजपला खच्ची करण्याचे काम सुरू आहे. महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला तरी आमच्याही काही भावना आहेत. आम्ही महायुतीचा धर्म पाळतो, मात्र मित्रपक्षांनीही महायुतीचा धर्म पाळावा, अशी माफक अपेक्षा असल्याचे सांगून भाजप नेते हर्षवर्धन पाटील Harshwardhan Patil यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्यासोबत इतिहासात काय झाले, याची आठवण करून दिली. तसेच नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही टोला लगावला. Harshvardhan Patil Complaint of Ajit Pawar to Devendra Fadnavis.

बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना Sunetra Pawar उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या मतदारसंघातील दुखावलेल्या नेत्यांनी जाहीरपणे अजित पवारांना विरोध केला. ए फॉर अमेठी आणि बी फॉर बारामती म्हणत भाजपने ही लढत पूर्वीपासूनच प्रतिष्ठेची केली आहे. तसचे नरेंद्र मोदींना Narendra Modi तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपने एकेक जागेसाठी जंग पछाडले आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीतील बंडाळी शांत करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतः लक्ष घातल्याचे दिसत आहे. त्यांनी आज इंदापूरमध्ये जाऊन भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी पटलांनी इंदापुरातील भाजपच्या कार्यकर्त्यांवर होणाऱ्या अन्यायाचा पाढाच वाचला.

पाटील म्हणाले, इंदापूर Indapur तालुक्याबाबत काय झाले या सर्व बाबींची फडणवीसांना कल्पना आहे. मात्र, मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे. महायुतीबाबत वरिष्ठांनी निर्णय घेतला. मात्र आमच्या कार्यकर्त्यांच्या काही भावना आहेत. आता जमलेले लोक सर्वसामान्य आहेत. यातील कुणी काॅन्ट्रॅक्टर, ठेकेदार नाही, कुणी लाभार्थी नाही. कुणीही मलिदागँगवाले नाहीत. सर्वजण स्वाभीमानी आहे. आमची एकच अपेक्षा आहे की महायुतीचा धर्म आम्ही पाळायचा तर आपल्या मित्रपक्षानेही पाळला पाहिजे.

या इंदापूरचा स्वाभिमानी कार्यकर्ता कधी काही मागणे करत नाही. तो कधी मिळण्यासठी कधी काम करत नाही. तत्त्वाने निष्ठने काम करतो. एकदा ठरलं तर ठरलंच आणि नाय ठरलं तर नाय ठरलं, ही भूमिका घेऊन काम करतो, असे म्हणत पाटलांनी थेट अजित पवारांना Ajit Pawar टार्गेट केले. तसेच इंदापूरमधील होणाऱ्या भ्रष्टाचार रोखणे गरजेचे असल्याचे सांगून पाटलांनी आमदार दत्तात्रेय भरणे यांच्यावरही नाव न घेता टीका केली आहे.

Devendra Fadnavis, Harshvardhan Patil
Vanchit News : पंकजा मुंडे अन् बजरंग सोनवणेंचा वंचित लावणार 'निकाल'? बीडमध्ये टाकणार मोठा डाव

भरणेमामांवर टीकास्त्र

तालु्क्यात होणाऱ्या भ्रष्टाचाराने लोक त्रस्त झालेले आहेत. येथील जनतेपर्यंत पंतप्रधान, राज्याने सुरू केलेल्या योजना पोहोचत नाहीत. तेथे ठेकेदारांचा कोंडावळा निर्माण झालेला आहे. त्यांचा त्रास भाजपच्या कार्यकर्त्यांना होतो. आपल्याकडे कुठलेही पद नसल्याने हा त्रास वाढतच आहे. गावाेगावच्या कार्यकर्त्यांना विकास निधी मिळत नाही. अधिकाऱ्यांवर दबाव आणला जातो. याचा परिणाम मतांवर होण्याची शक्यता असल्याचे सांगून पाटलांनी तालुक्यातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी गृहमंत्री या नात्याने फडणवीसांना लक्ष घालण्याचे आवाहनही केले.

(Edited by Sunil Dhumal)

R

Devendra Fadnavis, Harshvardhan Patil
Lok Sabha Election 2024 : शरद पवारांचे शिलेदार बाळ्यामामांच्या गोदामावरील कारवाईनंतर आव्हाड म्हणतात, "आम्ही घाबरणारे नाही...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com