कॅप्टनच्या एकाच बॉम्बमध्ये काँग्रेससोबत भाजपही गारद

अमरिंदरसिंग यांनी पाकिस्तानी पत्रकार अरूसा आलम यांच्यावरुन काँग्रेससह भाजपला अडचणीत आणले आहे.
Aroosa Alam with Sonia Gandhi and Sushma Swaraj
Aroosa Alam with Sonia Gandhi and Sushma Swaraj
Published on
Updated on

चंडीगड : पंजाबचे (Punjab) माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांनी काँग्रेसविरोधात उघडपणे भूमिका घेतली आहे. काँग्रेसमधून (Congress) बाहेर पडत स्वतंत्र पक्ष स्थापन करून काही अटींवर भाजपसोबत (BJP) जाण्याचेही जाहीर केले आहे. अमरिंदरसिंग यांना पाकिस्तानी पत्रकार अरूसा आलम यांच्यावरुन अडचणीत आणले जात होते. आता अमरिंदरसिंग यांनी या प्रकरणी काँग्रेससह भाजपवरच बॉम्ब टाकला आहे.

अमरिंदरसिंग यांची पाकिस्तानी पत्रकार अरूसा आलम (Aroosa Alam) यांच्याशी अनेक वर्षांपासून मैत्री आहे. पण अरूसा यांचा पाकिस्तानची (Pakistan) गुप्तचर संस्था असलेल्या आयएसआयशी (ISI) संबंध असल्याचा थेट आरोप पंजाबचे गृहमंत्री सुखजिंदर रंधावा यांनी केला आहे. त्यामुळे पंजाबच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अरूसा आलम यांची याबाबत चौकशी करण्याचे आदेश पोलिस महासंचालकांना दिले जातील, असे रंधावा म्हणाले आहेत. त्यामुळे अमरिंदरसिंग यांच्या अडचणी वाढल्याचे मानले जात होते.

यावर आता अमरिंदरसिंग यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून काँग्रेससह भाजपला अडचणीत आणले आहे. कॅप्टन यांनी फेसबुकवर 10 फोटो शेअर केले आहेत. यात अरुसा आलम या काँग्रेससह भाजपच्या बड्या नेत्यांसोबत दिसत आहेत. या फोटोंमध्ये अरूसा आलम यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, दिवगंत भाजप नेत्या सुषमा स्वराज, समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह आणि अमरसिंह, माजी केंद्रीय कायदा मंत्री अश्विनी कुमार, माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा, अभिनेते व माजी खासदार शत्रुघ्न सिन्हा, अभिनेते दिलीप कुमार यांच्यासह अनेक जण आहेत.

Aroosa Alam with Sonia Gandhi and Sushma Swaraj
कोरोना लस घेतल्याने अभिनेत्याचा मृत्यू? अखेर सत्य आलं बाहेर

कॅप्टन अमरिंदरसिंगांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी काही प्रतिष्ठित व्यक्तींचे अरुसा आलम यांच्यासोबतचे फोटो प्रसिद्ध करीत आहे. त्या सर्वांचे आयएसआयशी संबंध असावेत, असे मला वाटते. त्यामुळे प्रत्येकाने बोलण्याआधी विचार करायला हवा. भारत आणि पाकिस्तानमध्ये व्हिसा बंद होता नाही तर मी त्यावेळी पुन्हा बोलावले असते. योगायोग म्हणजे पुढील वर्षी मार्चमध्ये मी 80 वर्षांचा आणि अरूसा 69 वर्षांच्या होत आहेत. संकुचित वृत्तीच्या लोकांना हे कळणार नाही.

Aroosa Alam with Sonia Gandhi and Sushma Swaraj
दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना एसटीचा दणका; आज मध्यरात्रीपासून तिकिट महागलं

आगामी निवडणुकीत स्वतंत्र पक्ष स्थापन करू उतरणार असल्याचे अमरिंदरसिंग यांनी जाहीर केलं आहे. मागील वर्षभरापासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न सुटल्यास भाजपसोबत आघाडी करण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. त्यावरून काँग्रेसने अमरिंदरसिंग यांच्यावर निशाणा साधला आहे. अद्याप अमरिंदरसिंग यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेली नाही. त्यांनी पक्ष सोडण्याचे जाहीर केले असले तरी अधिकृरीत्या पक्षाचा राजीनामा दिलेला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com