Amravati Constituency 2024: आंबेडकरी चळवळीतील मतदार राष्ट्रीय पक्षांकडेच आकर्षित!

Amravati SC Reserved Constituency 2024: लोकसभेच्या निवडणुकीत अमरावती मतदारसंघात विक्रमी ३७ उमेदवार रिंगणात आले आहेत. गतवेळी ही संख्या २४ होती तर वर्ष २०१४ मध्ये १९ व २००९ मध्ये २२ इतकी होती.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Sarkarnama
Published on
Updated on

Amravati Constituency 2024: परिसीमन आयोगाने निर्मित केलेला अमरावती मतदारसंघ (Amravati Lok Sabha Constituency 2024) अनुसूचित जातीसाठी राखीव झाला असला तरी आंबेडकरी पक्षांच्या मताधिक्यांचा आलेख मात्र घसरता आहे. आंबेडकरी चळवळीतील मतदार राष्ट्रीय पक्षांकडेच आकर्षित झाले असून राखीव मतदारसंघात (Amravati SC reserved constituency) आंबेडकरी पक्षांना स्वतःचा उमेदवार निवडून आणता आलेला नाही.

रिपाइं व बसप या पक्षांचे मताधिक्य मतदारसंघ राखीव झाल्यानंतर घसरल्याचे दिसून आले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघात विक्रमी ३७ उमेदवार रिंगणात आले आहेत. गतवेळी ही संख्या २४ होती तर वर्ष २०१४ मध्ये १९ व २००९ मध्ये २२ इतकी होती.

गेल्या तीन निवडणुकीत आंबेडकरी मतांचा मोठा हिस्सा घेणाऱ्या बहुजन समाज पक्षाच्या मतांचा आलेख घसरलेला आहे. २००९ मध्ये बसपच्या माजी राज्यमंत्री गंगाधर गाडे यांना ५.७ टक्के, २०१४ मध्ये गुणवंत देवपारे यांना ९.८ टक्के व २०१९ मध्ये माजी नगराध्यक्ष अरुण वानखडे यांना केवळ १.१ टक्के मते मिळाली आहेत.

प्रत्येक निवडणुकीत बसपने उमेदवार बदलवण्याचा प्रयोग केला. मात्र २०१४ ची निवडणूक वगळता या पक्षाला फार मते खेचता आलेली नाहीत. याउलट पहिल्यांदाच वर्ष २०१९ मध्ये रिंगणात आलेल्या वंचित बहुजन आघाडीने ५.९ टक्के मते घेत निकाल बदलवण्याची किमया केली. आंबेडकरी चळवळीचा इतिहास असलेल्या अमरावती मतदारसंघात आंबेडकरी पक्षांना निवडणुकीत फार प्रभाव पाडता आलेला नाही.

Lok Sabha Election 2024
Kolhapur Lok Sabha 2024: मंडलिकांच्या एका सवयीवर अंबरीश घाटगेंची 10 हजारांची पैज

२००४ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघ राखीव होण्यापूर्वी रिपाइंच्या रा. सू. गवई यांनी या मतदारसंघात २२.३ टक्के मते घेतली होती. तर मतदारसंघ राखीव झाल्यानंतर झालेल्या २००९ च्या निवडणुकीत त्यांनी मतांचा टक्का वाढवत तो ३४.५ टक्क्यांवर नेला. या दोन्ही निवडणुकीत त्यांना कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे समर्थन होते.

Lok Sabha Election 2024
Unmesh Patil News: गिरीशभाऊ, तोंड सांभाळून बोला, जामनेरमधून बाहेर पडू देणार नाही; भाजपला सोडचिठ्ठी दिलेले खासदार...

त्यांचे पुत्र डॉ. राजेंद्र गवई यांनी २०१४ च्या निवडणुकीत रिपाइंच्या बॅनरखाली निवडणूक लढवली. मात्र ते फार मते खेचू शकले नाहीत. त्यांना केवळ ५.४ टक्के मते मिळाली. त्याचवेळी बसपचे गुणवंत देवपारे यांनी त्यांच्यापेक्षा अधिक मते खेचत ९.८ टक्के मते मिळवली. २०१९ मध्ये रिपाइंने उमेदवार न देता कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारास समर्थन दिले होते. यावर्षीही रिपाइंने (गवई) रिंगणातून माघार घेतली आहे.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com