Kolhapur Lok Sabha 2024: मंडलिकांच्या एका सवयीवर अंबरीश घाटगेंची 10 हजारांची पैज

Amrish Ghatge Vs Sanjay Mandlik: शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार संजय घाटगे यांचे पुत्र गोकुळचे संचालक अमरीश घाटगे यांच्याकडून महाविकास आघाडीची खिंड लढवली जात आहे. अशातच त्यांनी लावलेली पैज जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
Kolhapur Lok Sabha Constituency
Kolhapur Lok Sabha Constituency Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या (Kolhapur Lok Sabha Election 2024) प्रचाराला जवळजवळ आता रंग चढू लागला आहे. निवडणूक जवळ येत आहे, तसे अनेक प्रचाराचे विविध फंडे सत्ताधारी आणि विरोधकांकडून पाहायला मिळत आहेत. विद्यमान खासदार संजय मंडलिक (mp Sanjay Mandlik) विरुद्ध शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj Chhatrapati) यांच्यात दुरंगी लढत होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. उद्यापासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार आहे.

सर्वच नेत्यांनी आपल्यावर जबाबदारी घेऊन प्रचाराला सुरुवात केली असताना कागल तालुक्यातील प्रचाराला रंगत आली आहे. या विधानसभा मतदारसंघात महायुतीच पारडं जड असताना शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार संजय घाटगे यांचे पुत्र गोकुळचे संचालक अंबरीश घाटगे यांच्याकडून महाविकास आघाडीची खिंड लढवली जात आहे. अशातच त्यांनी लावलेली पैज जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

गेल्या काही दिवसांपासून खासदार संजय मंडलिक यांच्यावर सातत्याने महाविकास आघाडी कडून टीका होत आहे. गेल्या पाच वर्षांपासून विकासात कोणतेही योगदान नसल्याचे जाहीरपणे काँग्रेसचे नेते आरोप करतात. शिवाय गेल्या पाच वर्षांपासून जनतेशी संपर्क नाही असेही आरोप त्यांच्यावर केले जात आहेत. त्यातच कागलच्या होम पीच वरून गोकुळचे संचालक अंबरीश घाटगे यांनी विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्यावर आरोप करून खळबळ उडवून दिले आहे.

Kolhapur Lok Sabha Constituency
Beed News : शिवसेना उपजिल्हाप्रमुखांवर जीवघेणा हल्ला; नातेवाईकांना जीवे मारण्याच्या धमक्या

या मतदारसंघातील लोकांनी ज्यांनी कुणी खासदार संजय मंडलिक यांना फोन केला असेल. आणि तो फोन त्यांनी रिसिव्ह केला असेल तर माझ्याकडून दहा हजार रुपये घेऊन जावे, अशी पैज अंबरीश घाटगे यांनी लावली आहे. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे. ज्यासाठी खासदार मंडलिक यांना जनतेने निवडून दिले. मात्र त्या पद्धतीने कोल्हापूरची विकास कामे करण्यात ते कमी पडले, अशा शब्दात त्यांनी टिकेचा बाण खासदार मंडलिक यांच्यावर सोडला आहे.

Edited by: Mangesh Mahale

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com