

Amravati Municipal Election: नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यावर अमरावतीमध्ये आमदार रवी राणाविरुद्ध त्यांच्या पत्नी माजी खासदार नवनीत राणा यांच्यात संघर्ष होणार असल्याची चर्चा होती.
आमदार रवी राणा यांनी नगरपालिकेसाठी स्वबळाची घोषणा केली होती. त्यांचा राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्ष निवडणुकीत उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. पण आता रवी राणा यांनी आपली तलवार म्यान करीत 'भाजप के साथ' असल्याचे दाखवून दिले आहे.
अमरावती जिल्ह्यातील माजी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा या दांपत्याची भाजपशी जवळीक गेल्या काही वर्षांत वाढत असल्याचे चित्र आहे. लोकसभा तसेच विविध निवडणुकांमध्ये त्यांनी भाजपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा दिला आहे.
यंदाच्या स्थानिक निवडणुकांमध्ये राणा दापत्य काय भूमिका घेणार याकडे अमरावतीकरांचे लक्ष होते. सुरवातीला स्वबळाचा नारा देणाऱ्या रवी राणा यांनी आता खुलेआम भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदणार आहेत.
आपला राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार नगरपालिका निवडणुकीत मैदानात उतरविण्याऐवजी रवी राणा यांनी भाजपला साथ दिली आहे, ते भाजपच्या वळचणीला गेले असल्याची टीका विरोधक करीत आहेत.
राणा यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या उमेदवारांचा प्रचार करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे कार्यकर्ते आता स्वत:च्या पक्षाचा झेंडा खाली ठेवत हाती 'कमळ' घेत भाजपच्या प्रचार सभा, रॅलीत सहभागी होताना दिसत आहे.
अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रवी राणा यांचा प्रभाव आहे, त्यामुळे या परिसरातील प्रभागांमध्ये भाजपला त्यांचा फायदा होईल, असे दिसते. राणा यांनी 'एकला चलो रे'ची भूमिका घेतली असती तर भाजपला निवडणूक जड गेली असती. पण राणा यांच्या या निर्णयामुळे विरोधकांची दमछाक होईल, हे मात्र नक्की!
रवी राणा यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या स्वाभिमान पक्षाकडून जिल्ह्यात ४० जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे ठामपणे सांगितले होते. त्यासाठीची तयारीही त्यांनी सुरु केली होती. उमेदवार जाहीर केले होते, पण अचानक भूमिका बदलल्याने अमरावतीचे राजकारण ढवळून निघाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.