Analytics on Delhi Politics : काँग्रेस-आपच्या आघाडीने घायाळ झालेल्या भाजपसमोर 'क्लीन स्वीप'चे आव्हान!

Lok Sabha Election 2024 : काँग्रेस आणि आप एकत्र आले तर फारशी मजबूत आघाडी होणार नाही असा अंदाज लावला जात होता. परंतु हा अंदाज सपशेल खोटा ठरत आहे. त्यामुळे भाजपच्या अडचणीच नक्कीच वाढ झाली आहे.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Sarkarnama

Delhi Politics : 2014 च्या आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकींमध्ये भाजपने राजधानी दिल्लीतील सातही मतदारसंघांत यश मिळवले होते.परंतु या वर्षी भाजपला (BJP) सात जागा जिंकण्यासाठी आणि टिकवण्यासाठी मोठे आव्हान निर्माण झाले आहे. काँग्रेस आणि आप एकत्र आले तर फारशी मजबूत आघाडी होणार नाही असा अंदाज लावला जात होता. परंतु हा अंदाज सपशेल खोटा ठरला आहे. काँग्रेस (Congress) आणि आपमध्ये चांगलेच संबंध जुळून आले आहेत. त्यामुळे भाजपच्याअडचणीच नक्कीच वाढ झाली आहे.

गेल्या दोन्ही निवडणुकींमध्ये सातही जागा भाजपने जिंकल्या आहेत. या दोन्ही निवडणुकांच्या वेळी काँग्रेस आणि आपने वेगवेगळे उमेदवार दिले होते. त्यामुळे भाजपला या लढती लढणे सोपे झाले. मोदींचा करिश्मा अख्ख्या दिल्लीने बघितला. त्यातच मोदी (Narendra Modi) लाटेचाही फायदा भाजपला मिळाला.

मागच्या दहा वर्षात दिल्लीतील काँग्रेसची (Congress) मत देखील हळुहळु कमी होऊ लागले. आणि हा मतदार काँग्रेस सोडून आपकडे आणि काहीसा भाजपकडे वळाला. आज दिल्लीमध्ये काँग्रेसचा एकही आमदार किंवा खासदार नाही. त्यामुळे एका दशका पेक्षा जास्त काळ सत्ता गाजवलेल्या काँग्रेससाठी हा फार मोठा धक्का आहे.

या परिस्थितीत काँग्रेसची साथ आणि उभा राहण्याची संधी दिली ती 'आप'ने, दिल्लीकरांनी विधानसभेत आपला संधी दिली खरी पण केजरीवालांना त्यांचे अस्तित्व सिद्ध करण्याची लढाई लढावी लागली. समाजाला आपल्याशा वाटणाऱ्या आणि महत्त्वाच्या प्रश्नांकडे 'आप'ने लक्ष दिल्याने दिल्लीकरांच्या मनात 'आप'ने (AAP) आणि ओघाने अरविंद केजरीवाल (Arwind Kejriwal) यांनी स्थान निर्माण केले आहे.

केजरीवालांनी आणलेल्या योजना दिल्लीकरांसाठी क्रांतीकारी ठरल्या. ज्यामध्ये मोफत पाणी, मोफत वीज, महिलांना मोफत बससेवा, सरकारी शाळांची चांगली स्थिती त्यामुळे लोकांच्या मनात आप सरकार बद्दल विश्वास निर्माण झाला. याचा फायदा या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) आप आणि काँग्रेस आघाडीला होण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Lok Sabha Election 2024
Pune Porshe Accident : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोलिस आयुक्तालयात 'सरप्राईज व्हिजिट' !

मुख्यमंत्री केजरीवाल यांची प्रतिमा मलिन करणे गरजेचे असल्यानेच भाजपने दिल्ली मघधोरण घोटाळा बाहेर काढला. मात्र, निवडणुकीपूर्वी ही कारवाई झाल्याने आपवर अन्याय झाला. भाजपने मुख्यमंत्री केजरीवाल यांना तुरुंगात टाकून 'आप'ला संपविण्याचा विडा उचलला आहे.असे मत सामान्य लोकांमध्ये झाले. त्यामुळे लोकांमध्ये केजरीवाल यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली.

या घडनेमुळे दिल्लीतील आप आणि काँग्रेस नेते अधिक जवळ आले. या निवडणुकीत लोकांच्या प्रश्नांपेक्षा राजकीय मुद्दाच कळीचा विषय बनला आहे. केजरीवालांना मिळणाऱ्या सहानुभूतीमुळे चांगलाच फायदा होत आहे. Sarkarnama Analytics

दिल्लीतील या मतदारसंघात भाजपचे उमेदवार मनोज तिवारी (Manoj Tiwari) तर काँग्रेसने विद्यार्थी नेते कन्हैय्या कुमारला (kanhaiya kumar) मैदानात उतरवून रंगत भरली आहे. त्याचप्रमाणे नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघात भाजपने सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांच्या कन्या बांसुरी स्वराज (Basuri Swaraj) यांना मैदानात उतरवून नवी खेळी खेळली आहे. चांदणी चौकात काँग्रेसला पुन्हा विजयाची आशा आहे.

एकूण मतदार - 1 कोटी 47 लाख

पुरुष मतदार - 79.86 लाख

महिला मतदार - 67.38 लाख

Lok Sabha Election 2024
Pune Porshe Accident : दोघांना चिरडणाऱ्याला विशेष वागणूक कोणाच्या आशीर्वादाने? पोलिसांची भूमिका संशयास्पद : अतुल लोंढे

मतदारसंघ व उमेदवार

  1. नवी दिल्ली - बांसुरी स्वराज (भाजप) - सोमनाथ भारती (आप)

  2. चांदणी चौक - प्रवीण खंडेलवाल (भाजप) - जेपी अग्रवाल (काँग्रेस)

  3. उत्तर-पूर्व - मनोज तिवारी (भाजप) - कन्हैय्या कुमार (काँग्रेस)

  4. पूर्व दिल्ली - हर्ष मलहोत्रा (भाजप) - कुलदीप कुमार (आप)

  5. उत्तर-पश्चिम - योगेंद्र चंडोलिया (भाजप) - डॉ. उदित राज (काँग्रेस)

  6. पश्चिम दिल्ली - श्रीमती कमलजीत सेहरावत (भाजप) - महाबल मिश्रा (आप)

  7. दक्षिण दिल्ली - रामवीर सिंग बिधुडी (भाजप) - सहीराम पहेलवान (आप)

येत्या '25 मे' ला दिल्लीतील मतदान होणार आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत मतदार कोणाला कौल देतो हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com