Pune Porsche Accident : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोलिस आयुक्तालयात 'सरप्राईज व्हिजिट' !

Devendra Fadnavis Visit Pune CP Office : कोरेगाव पार्क परिसरातील कोझी आणि ब्लॅक पबच्या मॅनेजर यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. प्रल्हाद भुतडा, सचिन काटकर आणि संदीप सांगळे या तिघांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.अटक करण्यात आलेल्या या आरोपींविरोधात अल्पवयीन मुलाला दारू दिल्याप्रकरणी पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Devendra Fadanvis
Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Pune News : दोन दिवसांपूर्वी कल्याणीनगर येथे बांधकाम व्यवसायिकाच्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने गाडी चालवत दोन जणांना चिरडल्याची घटना घडली होती. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप होत आहेत.

पोलिसांनी ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळले त्याबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. त्यामुळे एक प्रकारे गृह खात्याच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी साडेचार वाजता अचानक पुणे पोलीस आयुक्तालय दाखल झाले आहेत.

पुण्यात रविवारी भरधाव वेगात असलेल्या पोर्श कारने दोघांना उडवलं,या घटनेत दोन अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी हा अल्पवयीन असून त्याला कोर्टाने काही तासांत जामीन मंजूर केला.

मात्र या प्रकरणात पोलिसांनी मुलाच्या वडिलांसह पबमध्ये प्रवेश देणाऱ्या हॉटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, हॉटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे, बार व्यवस्थापक जयेश बोनकर यांच्यावरही गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच या अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल हे फरार झाले होते. त्यांना पुणे पोलिसांच्या पथकाने मंगळवारी सकाळी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली. अग्रवाल हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Devendra Fadanvis
Pune Porsche Accident : पोर्शे कार अपघात प्रकरण : "इतक्या कमी वेळेत जामीन कसा काय?" युगेंद्र पवारांचा खडा सवाल

बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना अटक केल्यानंतर पुणे पोलीस (Police) ॲक्शन मोडवर आले आहेत.पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील कोझी आणि ब्लॅक पबच्या मॅनेजर यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

प्रल्हाद भुतडा, सचिन काटकर आणि संदीप सांगळे या तिघांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.अटक करण्यात आलेल्या या आरोपींविरोधात अल्पवयीन मुलाला दारू दिल्याप्रकरणी पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर या तिघांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत मंगळवारी सकाळी पोलीस आयुक्तांनी प्रेस कॉन्फरन्स घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणाची चौकशी केली असल्याचे सांगितलं होतं.

त्यानंतर दुपारी साडेचार च्या सुमाराचा अचानक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे आयुक्तालयात दाखल झाले असून या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेत आहेत. या प्रकरणांमध्ये आरोपीला तात्काळ जामीन मिळाल्यामुळे पोलिसांवरती टीका होत असतानाच गृह मंत्रालया देखील टीकेच्या फेरा सापडला आहे याच पार्श्वभूमीवरती देवेंद्र फडणवीस यांची ही व्हिजिट महत्त्वाची मानली जात आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Devendra Fadanvis
Pune Porsche Accident : पोलिस आयुक्त म्हणजे पुण्याला लागलेले 'कलंक', त्यांना बडतर्फ करा, राऊत कडाडले !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com