Ashok Chavan Join BJP : दणक्यात नाही लिमिटेड पक्ष प्रवेश

Ashok Chavan : अमित शाह यांच्यासमोर पक्ष प्रवेश का टाळला.
Ashok Chavan
Ashok ChavanSarkarnama
Published on
Updated on

Ashok Chavan Join BJP : आजअखेर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे घोषित केले आहे. काँग्रेसच्या बड्या नेत्याचा प्रवेश घेताना भाजपने दिल्ली स्थित बड्या नेत्यांसमोर टाळल्याचे चित्र आहे. त्यामुळे हा पक्ष प्रवेश सोहळा केवळ मुंबईपुरता मर्यादित ठेवत भाजपने अशोक चव्हाण यांना महाराष्ट्रापुरते संकुचित केल्याचे चित्र आहे. अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा असताना हा प्रवेश सोहळा घेता आला असता.

नांदेड येथे जाहीर पक्ष सोहळा आयोजित करता आला असता, पण अशा प्रकारचा बडा सोहळा आयोजित न करता थेट मुंबईत भाजप पक्ष कार्यालयात प्रवेश होणार असल्याने काँग्रेसच्या बड्या नेत्याचा पक्ष प्रवेश सोहळा अतिशय किरकोळ का ? असा प्रश्न अशोक चव्हाण यांच्या समर्थकांना पडला आहे. त्याचबरोबर आता अशोक चव्हाण यांच्यासोबत अजून कोण प्रवेश करणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Ashok Chavan Join Bjp Latest News )

माजी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिला. त्याचबरोबर विधानसभा अध्यक्षांना आमदारकीचा राजीनामा सुपूर्त केला. अशोक चव्हाण यांनी काल केवळ काँग्रेसचा राजीनामा देत असल्याचे सांगत कुठे जाणार, यावर मात्र भाष्य केले नाही. त्यामुळे दिवसभर त्यांच्यावर फोकस राहिला. त्यांच्या काँग्रेस राजीनाम्यानंतर राज्यात त्यावर जोरदार चर्चा रंगली. आज अशोक चव्हाण यांनी सकाळी पत्रकारांना ते आज मुंबईत भाजपमध्ये जाणार असल्याचे सांगत इतर सोहळ्यांची कुठलीही घोषणा केली नाही. त्यामुळे अशोक चव्हाण यांची नवी इनिंग ही केवळ मर्यादित ठेवण्यात आल्याचे चित्र आहे. अमित शाह यांच्यासमोर पक्ष प्रवेश का टाळला गेला, असा प्रश्न विचारला जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ashok Chavan
Ashok Chavan : अखेर ठरलं! चव्हाणांची आजपासून नवी इनिंग; म्हणाले, "माझ्या..."

अशोक चव्हाण यांना राज्यसभेत पाठविण्यासाठी या जलद घडामोडी काय आहेत, असा संशय व्यक्त केला जात असून, त्यामुळे आता भाजपने राज्यसभेत चौथा उमेदवार उभा करण्याची तयारी सुरू केल्याचे चित्र आहे. हा चौथा उमेदवार काँग्रेसची मते फोडून तर भाजप जिंकविणार नाही ना अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. काँग्रेसच्या बड्या नेत्याला भाजपचा राज्यसभेचा खासदार करत त्यांच्या मुलीसाठी पक्षात कुठे स्थान निर्माण होत आहे काय याची चाचपणी सुरू झाली आहे.

चारदा आमदार, दोनदा खासदार, दोनदा मुख्यमंत्री, एकदा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि विविध खात्यांचे मंत्री असा मोठा इतिहास अशोक चव्हाण यांचा आहे. त्याच पक्ष प्रवेश सोहळा भाजपने दणक्यात घेण्याची गरज असताना अतिशय किरकोळ पद्धतीने प्रक्ष प्रवेश भाजपने का दिला हादेखील चर्चेचा विषय झाला आहे. काँग्रेसला बडा नेता सांभाळता आला नाही हे जरी खरे असले तरी भाजपनेदेखील या बड्या नेत्याचा प्रवेश सोहळा लिमिटेड ठेवण्यात का पुढाकार घेतला हा मुद्दा आज चर्चिला जात आहे.

पक्ष प्रवेशाचा आदर्श सोहळा न करता तो लिमिटेड सोहळा करण्यात भाजपला वरिष्ठांनी आदेश दिला काय असा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या पक्ष प्रवेशाने इतर अनेक प्रश्नांची उत्तरे लपविण्याची तयारी भाजपने केल्याचे चित्र आहे. या पक्ष सोहळ्यानंतर आदर्श घोटाळ्यानंतर प्रश्न विचारणारे भाजप नेते हे अशोक चव्हाण यांचे गुणगान गाण्यात व्यस्त असतील असेच एकूण चित्र आहे. आज अशोक चव्हाण यांचा पक्ष प्रवेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थित होत आहे.

Ashok Chavan
Ashok Chavan : "चॅप्टर इज ओव्हर...", राहुल गांधींबाबत प्रश्न अन् अशोक चव्हाणांचं उत्तर

अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी देताना भाजप स्वतःच्या हक्काच्या तीन जागा कायम ठेवत चौथा उमेदवार देण्याची शक्यता आहे. त्यात अशोक चव्हाण हे चौथे उमेदवार असतील की पहिले असा मुद्दा आता निर्माण होत आहे. भाजप (BJP) मध्ये काँग्रेस नेत्यांच्या गळ्यात थेट राज्यसभेची माळ घालण्याचा उद्योग महाराष्ट्रात नेमका सुरू कसा झाला, असा प्रश्न भाजप वरिष्ठ नेत्यांना पडला आहे. त्यामुळे भाजपमध्ये जाताना अशोक चव्हाण यांना लाभाचे पद भाजपने देण्याचे आश्वासन दिल्याचे चित्र तूर्तास निर्माण झाले आहे. काँग्रेसचे मिलिंद देवरा हे शिवसेना (शिंदे गटाचे) राज्यसभेचे संभाव्य उमेदवार राहतील. त्याच बरोबर आज प्रवेश करणारे अशोक चव्हाण हे भाजपचे राज्यसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून समोर येत आहेत. अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना गळास लावून भाजपने काँग्रेसच्या वाट्याला जाणारे राज्यसभेची एक जागादेखील भाजपकडे खेचण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे.

R

Ashok Chavan
Ashok Chavan Resignation : मोठी बातमी - काँग्रेससोबत किती आमदार? उद्या चित्र स्पष्ट होणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com