Ashok Chavan : "चॅप्टर इज ओव्हर...", राहुल गांधींबाबत प्रश्न अन् अशोक चव्हाणांचं उत्तर

Ashok Chavan Join Bjp : "आज माझ्या राजकीय आयुष्याची नव्यानं सुरुवात करत आहे", असं चव्हाणांनी सांगितलं.
Ashok Chavan Rahu Gandhi
Ashok Chavan Rahu GandhiSarkarnama
Published on
Updated on

महाराष्ट्र काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) यांनी सोमवारी ( 12 फेब्रुवारी ) पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. अशोक चव्हाण सतत भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा होत होती. अखेर ते मंगळवारी ( 13 फेब्रुवारी ) भाजपत प्रवेश करणार आहेत. प्रवेशापूर्वी चव्हाणांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत एक प्रश्न विचारल्यावर अशोक चव्हाणांनी दिलेल्या उत्तराची चर्चा सुरू झाली आहे.

Ashok Chavan Rahu Gandhi
Kolhapur Politics: चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर कोल्हापूर काँग्रेस मजबूतच, महायुतीला देणार फाइट

"आज माझ्या राजकीय आयुष्याची नव्यानं सुरुवात करत आहे. मी अधिकृतरित्या भाजपत प्रवेश करणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलारांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश करेन. तेव्हा, अन्य जिल्ह्यांतील संभाव्य नेते भाजपत प्रवेश करू शकतात," असं अशोक चव्हाणांनी सांगितलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राहुल गांधी किंवा अन्य नेत्यांनी तुमच्याशी संपर्क केला का? असा प्रश्न प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीनं विचारला. त्यावर अशोक चव्हाण म्हणाले, "अब छोडीये... चॅप्टर इज ओव्हर... नई शुरुवात है..."

Ashok Chavan Rahu Gandhi
Ashok Chavan Join BJP : दणक्यात नाही लिमिटेड पक्ष प्रवेश

अशोक चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी?

अशोक चव्हाण यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. चव्हाणांच्या पक्ष प्रवेशानंतर भाजपकडून राज्यसभा उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. अशोक चव्हाणांबरोबर आज माजी आमदार अमर राजूरकर वगळता कुणीही विद्यमान आमदार भाजपत प्रवेश करणार नाही. मात्र, राज्यसभा निवडणुकीत भाजपनं चौथा उमेदवार उभा केल्यास चव्हाण गटातील काँग्रेस आमदारांकडून क्रॉस व्होटिंग होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

R

Ashok Chavan Rahu Gandhi
Ashok Chavan Resignation : चव्हाणांच्या काँग्रेसमधील जुन्या सहकाऱ्यानं सगळंच काढलं, भाजपवरही केला हल्लाबोल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com