Ashok Chavan : 'या' दोन घटनांनीच मिळाले होते अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाचे संकेत

Political News : अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्याने महाराष्ट्रातील राजकारणात भूकंप झाला आहे.
Ashok Chavan Amit Shah
Ashok Chavan Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Congress News : महाराष्ट्रातील काँग्रेसच्या जडणघडणीत चव्हाण कुटुंबीयांचा मोठा वाटा राहिला आहे. तर काँग्रेसनेही त्यांना भरभरून दिले. शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण या पिता पुत्रांना मुख्यमंत्री होण्याची संधी काँग्रेसनेच दिली. दोघेही दोनवेळा राज्याचे मुख्यमंत्री झाले. आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर असतानाच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला धक्का देत राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्याने महाराष्ट्रातील राजकारणात भूकंप झाला आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकला असून ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा जोरात सुरु आहे. लवकरच ते भाजपवासीय होय शकतात. अशोक चव्हाणांचा राजीनामा धक्कादायक मानला जात असला तरी त्याचे संकेत जवळपास दोन वर्ष आधीपासूनच मिळत होते. शिवसेनेत फ़ूट पडल्यानंतर अगदी सरकार कोसळले. त्यावेळी जुलै २०२२ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले. त्यावेळी अशोक चव्हाण हे बहुमत चाचणीच्या वेळी सभागृहात उशिरा पोहचले होते. तेव्हापासूनच अशोक चव्हाण पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

Ashok Chavan Amit Shah
Ashok Chavan : अशोकरावांचा राजीनामा अन् पृथ्वीराजबाबांनी बोलून दाखवली मनातली 'ही' खंत

२०२२ मध्ये विश्वास दर्शक ठरावाच्यावेळी अशोक चव्हाण सभागृहात उशिरा पोहचले होते. त्यामुळे त्यांना मतदान करता आले नव्हते. त्यांच्यासोबत इतर चार ते पाच आमदार बहुमत चाचणीपासून दूर राहिले होते. त्यानंतर "आमच्या पाठीशी असणाऱ्या अदृश्य हातांचे आभार" असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भरसभागृहात म्हणाले होते. त्यामुळे हे अदृश्य हात कोणाचे होते ते बऱ्याच जणांच्या लक्षात आले होते.

त्यानंतर काही जणांनी खरोखरच त्यांना पोचण्यास उशीर झाला. ते भाजपमध्ये जाणार नसल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर या संपूर्ण प्रकारणाची दखल काँग्रेस पक्षाने घेतली होती. पक्षविरोधी कार्यवाही केल्याप्रकरणी काँग्रेसने त्यावेळी अशोक चव्हाण यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तेव्हापासून अशोक चव्हाण पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काही दिवसाताच अशोक चव्हाण पक्ष सोडणार असल्याच्या चर्चाही २०२२ मध्येच काँग्रेसच्या गोटात सुरू झाल्या होत्या. पण या चर्चांना काही महत्त्व नाही, मी असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही, अशी प्रतिक्रिया त्यावेळी अशोक चव्हाण यांनी दिली होती. मात्र, या दोन घटनेच्या माध्यमातून ते भाजपच्या वाटेवर असल्याचे लक्षात आले होते.

काँग्रेस पक्ष सोडण्यास ते तयार झाले होते. मात्र, स्थानिक भाजप (Bjp) नेत्यांचा त्यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध होता. त्यामुळे अशोक चव्हाण (Ashok chavan) काँग्रेस प्रवेशासाठी इच्छूक असले तरी त्यांच्या प्रवेशात अडचणी येत असल्याने त्यांचा प्रवेश सोहळा लांबणीवर पडला होता.

Ashok Chavan Amit Shah
Ashok Chavan Resigns : विश्वासघातकी..! चव्हाणांच्या राजीनाम्यावर काँग्रेसच्या बड्या नेत्याची पहिली प्रतिक्रिया...

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com