Ashok Chavan : अशोकराव, काँग्रेसकडून तुम्हाला आणखी काय हवे होते ?

Political News: अशोक चव्हाण हे स्वतः दोनदा मुख्यमंत्री होते.
ashok Chavan, shnakarrao chavan
ashok Chavan, shnakarrao chavan Sarkarnama
Published on
Updated on

Congress News: वडील मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, राजकारण आणि प्रशासनात त्यांची एक छाप होती. अशोक चव्हाण हे स्वतः दोनदा मुख्यमंत्री होते तर पुन्हा मंत्री झाले. अशोक चव्हाण यांना गेल्या 30 वर्षांत भरभरून दिले. पक्षाकडून आणखी काय हवं होतं... असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे.

अशोक चव्हाण यांच्या जन्म जरी मुंबईत झाला असला तरी ते मुळचे संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील. पण त्यांचे मुळगाव नांदेडमधील असल्याने चव्हाण घराणं आणि नांदेड हे समीकरणच झाले होते. वडील शंकरराव चव्हाण यांनी दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवले. या पितापुत्राने काँग्रेसला मराठवाड्यात मोठं केले.

बीएसस्सी आणि एमबीए पदवी असताना वडिलांसोबत त्यांनी 1985 मध्ये राजकारणात प्रवेश केला. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष ही महत्त्वाची जबाबदारी त्यांनी निष्ठेने पाळली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. 1987 मधील लोकसभा निवणडणुकीत अशोक चव्हाण विजयी झाले आणि ते नांदेडचे सर्वस्व झाले.

ashok Chavan, shnakarrao chavan
Ashok Chavan Resignation : अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडली अन् नांदेडचे पक्ष कार्यालय झाले रिकामे

भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांना पराभव करुन वयाच्या 30 व्या वर्षीच अशोक चव्हाण खासदार झाले होते. त्यानंतर 1992 मध्ये ते विधानपरिषदेचे सदस्य आणि मग 1993 मध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री झाले. 1995 ते 1999 पर्यंत त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव पद भूषवले होते. त्यानंतर 2003 मध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये ते सांस्कृतिक, उद्योग, खाण या खात्यांचेही मंत्री होते.

2008 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे विलासराव देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदाची पहिल्यांदा जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर 2009 च्या विधानसभा निवडणुकीत अगदी सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाची संधी देण्यात आली. त्यानंतर वर्षभरातच आदर्शच्या घोटाळाच्या आरोपानंतर त्यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले.

2010 साली आदर्श हाउसिंग सोसायटी या कारगिलमधील हुतात्म्यांच्या वारसदारांसाठी मुंबईत बांधण्यात आलेल्या इमारतीत त्यांनी आपल्या नातेवाईकांना घरे देऊ केल्याबद्दल गदारोळ होऊन त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणे भाग पडले. त्यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ झाली आणि राजकीय प्रवासाला उतरती कळा लागली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसने प्रत्येकवेळी त्यांच्यावर मोठा विश्वास दाखवला. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असल्याने अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना पक्षाने भरभरून दिले. 2014 मध्ये त्यांना नांदेडमधून लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरवले होते.अन मोदी लाटेत ते निवडून आले. सॊबतच त्यांच्या पत्नीला भोकर मतदारसंघातून रिंगणात उतरवले होते. त्या आमदारपण झाल्या.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना एक लाखाच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर पक्षाने विश्वास दाखवत त्यांना भोकर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली अन ते विजयी झाले. राज्यात 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले त्यानंतर काँग्रेसमधील काही नेत्यांचा वरिष्ठ नेत्यांना मंत्रिपद देण्यास विरोध असताना त्यांची महसूल मंत्रीपद दिले होते. त्यानंतर मधला केवळ एक ते दीड वर्षाच्या काळात त्यांना सत्तेपासून दूर राहावे लागले.

त्यातच त्यांनी सोमवारी काँग्रेसचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. विशेषतः काँग्रेसचे प्रदेशाअध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी उलट भाजपवर आरोप करीत पक्ष सोडला होता. मात्र, ते कुठल्याच धमकीला घाबरले नाहीत. किमान त्यांचा तर 'आदर्श' या निमित्ताने अशोक चव्हाण यांनी घ्याला हवा होता. त्या उलट त्यांचे वडील शंकरराव चव्हाण हे काँग्रेसशी एक निष्ठ राहिले. त्यांच्याकडून पक्षनिष्ठेचा 'आदर्श' घ्यावयास हवा होता.

ashok Chavan, shnakarrao chavan
Ashok Chavan : 'या' नेत्यांच्या विरोधामुळेच चव्हाणांचा मंत्रिपदाचा पत्ता कट; खासदारकीवर बोळवण

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com