Ashok Chavan Resignation : अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडली अन् नांदेडचे पक्ष कार्यालय झाले रिकामे

Nanded Congress : नांदेड जिल्ह्याची काँग्रेस म्हणजे अशोक चव्हाण आणि चव्हाण म्हणजेच काँग्रेस असे समीकरण गेल्या कित्येक वर्षापासून बनले होते.
Ashok Chavan
Ashok Chavan Sarkarnama

Nanded News: नांदेड जिल्ह्याची काँग्रेस म्हणजे अशोक चव्हाण आणि चव्हाण म्हणजेच काँग्रेस असे समीकरण गेल्या कित्येक वर्षापासून बनले होते. दिवंगत शंकरराव चव्हाण यांचा राजकीय वारसा चालवणाऱ्या अशोक चव्हाण यांनी दोनवेळा राज्याचे मुख्यमंत्रिपद आणि एकदा खासदारकी उपभोगली. नांदेडच्या राजकारणात अशोक चव्हाण यांच्याशिवाय पत्ताही हलत नसे, त्यामुळे काँग्रेसचे जिल्हा कार्यालय, अशोक चव्हाण यांचा शहरातील आनंद निलमय बंगला कायम गर्दीने गजबजलेला असयाचा. (Ashok Chavan Resignation)

आज अशोक चव्हाण मोठा राजकीय निर्णय घेणार, त्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार याची चर्चा स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांमध्ये होती. अपेक्षेप्रमाणे दुपारी अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा आणि काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि नेहमी गर्दीने गजबजणारा चव्हाण यांचा बंगला, काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्यालय ओस पडले. काँग्रेसच्या जिल्ह्यातील इतर माजी मंत्री, आमदारांचे निवासस्थान आणि संपर्क कार्यालयातही असेच चित्र होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ashok Chavan
Ashok Chavan : अशोक चव्हाण, डी. पी. सावंत, राजूरकरांच्या घराबाहेर शुकशुकाट

शहरातील जिल्हा काँग्रेस कमेटीचे कार्यालय आज नेहमीप्रमाणे उघडले खरे, पण तिकडे एकही पदाधिकारी, कार्यकर्ता फिरकला नाही. या कार्यालयात नेहमी वर्दळ असते, पण आज हे चित्र पहायला मिळाले नाही. जिल्ह्याच्या राजकारणात अशोक चव्हाण यांचा दबदबा कायम राहिला आहे.

मतदारसंघासह जिल्ह्यातील लोक, पदाधिकारी, कार्यकर्ते आपल्या अडचणी, प्रश्न घेऊन चव्हाण यांच्याकडे येत. शहरातील काँग्रेस पक्षाचे कार्यालयही नेहमीच गजबजलेले असते. रोजच्या प्रमाणे आज सकाळी कार्यालय उघडण्यात आले. पण तिकडे कोणीच फिरकले नाही. अशोक चव्हाण मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा काँग्रेसच्या गोटात सकाळ पासून सुरू होती. पदाधिकारी व कार्यकर्ते एकमेकांना संपर्क करून खात्री करत होते. पण चव्हाणांच्या निकटवर्तीयांना या बाबतीत कमालीची गुप्तता पाळली.

माजी आमदार अमरनाथ राजूरकर, माजी मंत्री डी.पी.सावंत हेही नांदेड शहरत नव्हते. नांदेड शहरातील कार्यालयात जबाबदारी पदाधिकारीही उपस्थित नव्हते. कार्यालयात शुकशुकाट असल्याने अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याचे वृत्त धडकताच माध्यमांचे प्रतिनिधी प्रतिक्रियेसाठी स्थानिक नेत्यांचा शोध घेत होते. पण प्रतिक्रियेला कोणीही उपलब्ध नव्हते. काँग्रेसच्या इतक्या वर्षाच्या काळात असा शुकशुकाट अन् शांतता पहिल्यांदा नांदेडकरांनी अनुभवली.

(Edited By-Ganesh Thombare)

Ashok Chavan
Ashok Chavan Resignation : अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर; मराठवाड्यातील काँग्रेस आमदारांचे काय ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com