Sangli Politics : आटपाडीचे नेतृत्व नक्की कोण करणार? देशमुख की पडळकर?

Rajendra Deshmukh vs Gopichand Padalkar : राजेंद्रअण्णा देशमुखांसमोर गोपीचंद पडळकरांचे आव्हान?
Rajendra Deshmukh, Gopichand Padalkar
Rajendra Deshmukh, Gopichand PadalkarSarkarnama
Published on
Updated on

विद्याधर कुलकर्णी -

Atpadi Khanapur VidhanSabha Constituency :

खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघामध्ये खानापूर व आटपाडी असे दोन तालुके येतात. 1995 मध्ये आटपाडीचेच माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख हे विजयी झाले होते. त्यावेळी राज्यामध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर आले होते. त्यावेळी राजेंद्रअण्णा यांनी सरकारला जाहीर पाठिंबा दिला होता. टेंभू योजनेसाठी जास्तीचा निधी मिळावा व ती पूर्ण व्हावी, हीच एक अट घातली होती. त्यावेळी राजेंद्रअण्णांचा संपूर्ण मतदारसंघामध्ये चांगला जनसंपर्क होता.

परंतु 1999 च्या निवडणुकीमध्ये त्यांनी नरमाईची भूमिका घेतल्याने त्यांना थांबावे लागले. त्यावेळी खानापूर तालुक्यातील आमदार म्हणून Anil Babar हे निवडून आले. नंतर प्रत्येक निवडणुकीमध्ये खानापूर तालुक्यामधूनच आमदार म्हणून निवडून येऊ लागले. प्रत्येक वेळी राजेंद्रअण्णा व देशमुख कुटुंबीय कोणालातरी पाठिंबा द्यायचा हे धोरण अवलंबले. मधल्या काळात त्यांनी निवडणूक लढवली. परंतु ते विधानसभेपर्यंत पोहोचले नाहीत.

Rajendra Deshmukh, Gopichand Padalkar
Tanaji Sawant Vs Ravindra Gaikwad : रवींद्र गायकवाडांविरोधातला एक डाव उलटताच तानाजी सावंतांनी टाकला दुसरा डाव...

राजेंद्र देशमुख कसे मागे पडले?

मुळात या मतदारसंघात खानापूर व आटपाडी असे दोन तालुके येतात. आटपाडी तालुक्यातून त्यांना मतदारांचे पाठबळ प्राप्त झाले. पण त्यांना खानापूर तालुक्यातील मतदारांचा पाठिंबा जास्त मिळाला नाही. सत्ता नसल्यामुळे त्यांना त्यांच्या आटपाडी व तालुक्यात बऱ्याच अडचणी येऊ लागल्या. त्यांना आहे त्या परिस्थितीत सामोरे जावे लागले. त्यामधून त्यांचे सच्चे आणि कट्टर समर्थक कार्यकर्ते विस्कळीत झाले. आटपाडी आणि खानापूर तालुक्यांचा विकास करण्यामध्ये अडचणी निर्माण होऊ लागल्या.

राजेंद्रअण्णांनी दुष्काळी असणाऱ्या आटपाडी भागामध्ये सूत गिरणी, साखर कारखाने आणि शिक्षण संस्था चांगल्या पद्धतीने चालवल्या होत्या. परंतु सत्ता स्वतःजवळ नसल्याने त्यामध्ये काही वेळेला अडचणी निर्माण झाल्या आणि त्यातूनच त्या बंद पडण्याच्या मार्गावर गेल्या.

राजेंद्रअण्णांच्या घरामध्ये बरेच नेते होते. त्यांचे बंधू माजी सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष अमर बापू देशमुख हे काम पाहत होते. त्यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आटपाडी व तालुक्याचा विकास साधण्याचा प्रयत्न केला. त्याला थोडेफार यशही आले. पण त्यांनी योग्य वेळी योग्य भूमिका व निर्णय न घेतल्याने त्यांचेही अधःपतन झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पडळकर की देशमुख?

देशमुख घराण्याने एकेकाळी संपूर्ण परिसरामध्ये एक लौकिक मिळवला होता. लोकनेते बाबासाहेब देशमुख, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, माजी जि. प. अध्यक्ष अमरसिंह देशमुख, उद्योजक संजय देशमुख, आटपाडी पंचायत समितीचे सभापती हर्षवर्धन देशमुख यांचा दबदबा होता. नंतर आटपाडी तालुक्यामध्ये बरेच नवे नेतृत्व तयार होऊ लागले.

त्यामध्ये प्रामुख्याने करगणीतून अण्णासाहेब पत्की, आटपाडीतून माजी जि. प. सदस्य तानाजीराव पाटील, दिघंचीचे हणमंतराव देशमुख, अमोल मोरे, झरे पडळकरवाडी भागातून पडळकर बंधू, नेलकरंजीमधून माजी जि. प. उपाध्यक्ष कै. मोहनराव भोसले असे नवे नेतृत्व तयार होऊन या मतदारसंघांमध्ये पाय रोवण्याचा प्रयत्न करू लागले. याचा सर्वात जास्त फायदा गोपीचंद पडळकर यांना झाला.

भाजपने गोपीचंद पडळकर यांची विधान परिषदेवर नियुक्ती केली आणि ते आमदार झाले. त्यातून काही जणांना थोडेफार यश मिळाले. परंतु ते विधानसभेमध्ये पोहोचवणारे नव्हते. याचे मुख्य कारण या सर्वांमध्ये एकी व एकवाक्यता नव्हती आणि त्यांचे खानापूर तालुक्यात जनतेशी नाळ नसल्याने सर्वांचे राजकारण मर्यादित राहिले.

आताही परिस्थिती फार वेगळी नाही. अजूनही खानापूर तालुक्यात आटपाडीच्या सर्व नेत्यांचा जनता व मतदारांपर्यंत म्हणावा असा सुसंवाद नाही. जोपर्यंत दोन्ही तालुक्यांत समतोल होत नाही, तोपर्यंत आटपाडी भागातील नेत्यांचे आव्हान दिसून येणार नाही आणि आटपाडीचाच आमदार होणार नाही, अशी चर्चा संपूर्ण मतदारसंघामध्ये आहे.

edited by sachin fulpagare

R...

Rajendra Deshmukh, Gopichand Padalkar
Sadashivrao patil : सदाशिवराव पाटील सध्या इतके शांत का? मतदारसंघात चुप्पी...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com