गोड बोलायच्या दिवशीही भातखळकरांनी राऊतांना सोडले नाही... औकात काढली!

संजय राऊत (Sanjay Raut) विरुद्ध भातखळकर (Atul Bhatkhalkar) असा सामना सध्या रोज सुरू आहे..
Sanjay Raut-Atul Bhatkhalkar
Sanjay Raut-Atul Bhatkhalkarsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा वाद रोज झडत असतो. त्यासाठीचे योद्धेही ठरलेले आहेत. त्यात शिवसेनेकडून संजय राऊत, (Sanjay Raut) राष्ट्रवादीकडून नवाब मलिक, (Nawab Malik) काॅंग्रेसकडून खुद्द नाना पटोले (Nana Patole) असे बडे नेते रिंगणात असतात. भाजपकडूनही बड्या तोफा आग ओकत असतात. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील हे आघाडीवर राहतात तर अतुल भातखळकर, (Atul Bhatkhalkar) केशव उपाध्ये ही मंडळी मागे राहून भालाफेक करत असतात.

Sanjay Raut-Atul Bhatkhalkar
दरेकरांच्या संक्रातीची गोडी कमी झाली... उपाध्यक्षांना घेऊन फडणविसांना भेटले

14 जानेवारी हा संक्रातीचा सण. या दिवशी तिळगूळ देऊन गोड बोलायचे असते. पण असा गोडवा काही भाजप आणि शिवसेनेत आजच्या दिवशीही दिसून आला नाही. त्यासाठी मुद्दा मिळाला तो मराठी पाट्यांचा. महाविकास आघाडीने मराठी पाट्या सक्तीच्या आणि मोठ्या लावण्याचा नियम केल्यानंतर त्याला काही मंडळी विरोध करत आहेत. त्यांना इशारा देताना राऊत यांनी `विरोध कसला करता? तुम्हाला मुंबईत, महाराष्ट्रात राहायचं आहे. व्यापार करायचा आहे, हे विसरू नका. हे काही कोणाच राजकीय किंवा वैयक्तिक मत नाही. पाट्या लावणार नाही म्हणजे काय, असा सवाला विचारला होता.

त्यांच्या या उत्तराला भातखळकर यांनी आक्षेप घेत, हीच भाषा, हीच मग्रुरी, हाच रुबाब मोहम्मद अली मोहम्मद अली रोड, भेंडी बाजार, भायखळा इथल्याही अमराठी पाट्यांना दाखवा... पाहूया तुमची हिम्मत... औकात असेल तर करून दाखवा, असे आव्हान दिले. अगदी संक्रांतीच्या दिवशीही त्यांनी राऊतांची औकात काढली. दुसऱ्या एका ट्विटमध्ये त्यांनी `मराठी अस्मिता हा शिवसेनेचा आत्मा आहे- इति संजय राऊत. मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आल्यामुळे आता मराठी अस्मितेची आठवण झाली आहे. सोबत तोंडी लावायला उर्दू लर्निंग सेंटर आहेच,`असा टोला आजच्याच दिवशी लगावला आहे.

भातखळकर गेले काही दिवस सातत्याने शरद पवार आणि राऊत यांना लक्ष्य करत असल्याचे त्यांच्या ट्विटवरून दिसून येत आहे. त्यातील काही नमुने पुढीलप्रमाणे

घरी बसण्याचा निकष लावला तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्वात मोठे आहेत. त्यांची कुणाशी तुलनाच होऊ शकत नाही. कुंभकर्णसुद्धा सहा महिन्यांनी जागा व्हायचा हे कुणी तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगण्याची गरज आहे. संजय राऊत गेले १७ महिने घरी बसलेल्या, अकार्यक्षमतेमुळे राज्यात आराजकाची स्थिती निर्माण करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा विषय सोडून बाकी सर्व विषयांवर ज्ञान पाजळत असतात, अशी टिका भातखळकर यांनी राऊत यांच्यावर 12 जानेवारी रोजी केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com