Best Election: ठाकरे बंधूंचा पराभव, शशांक राव यांचा विजय... मग भाजपा एवढा खूश का? हाती काय लागलं?

Best Election: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील BESTच्या बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची निवडणूक ही ठाकरे बंधुंनी प्रतिष्ठेची बनवली होती.
Raj Thackeray And Uddhav Thackeray
BEST Election 2025 saw a major setback for the Thackeray brothers as their alliance panel failed to secure a single seat, while BJP-backed groups dominated.Sarkarnama
Published on
Updated on

Best Election: मुंबईतील BEST (Brihanmumbai Electric Supply and Transport) च्या बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या बंधुंनी आपलं संयुक्त उत्कर्ष पॅनेल उभं केलं होतं. या पॅनलचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला. त्यांना एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही.

पण दुसरीकडं शशांक राव यांच्या बेस्ट वर्कर्स युनियन या पॅनेलनं घवघवीत यश मिळवलं. त्यातच महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनलला देखील चांगलं यश मिळालं. एकूणच शशांक राव यांच्या स्वतंत्र पॅनेलचा यात विजय झालेला असतानाही भाजप या निकालावर अत्यंत खूश असल्याचं दिसून आलं. याचं कारण ठाकरेंचा पराभव असलं तरी त्यामुळं भाजपला नेमकं काय मिळालं? हे जाणून घेऊयात.

Raj Thackeray And Uddhav Thackeray
Best Credit Society Election: ठाकरे ब्रँड रिजेक्ट! बेस्टच्या निवडणुकीवरून फडणवीसांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले, राजकारण...

या निवडणुकीत एकूण २१ जागांपैकी शशांक राव यांच्या बेस्ट वर्कर्स युनियन या पॅनेलला १४ जागा, महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनलला ७ जागा तर ठाकरे बंधुंच्या उत्कर्ष पॅनलला ० जागा मिळाल्या. यामध्ये भाजपचा पराभव झाला आहे, तरीही बेस्टच्या निकालावर भाजप खूश असण्यामागं पाच मुद्दे कारणीभूत असल्याचं सांगता येईल. यामध्ये आगामी महापालिकेच्या निवडणुकीत जर ठाकरे बंधू एकत्र लढणार असतील तर त्यापूर्वीच त्यांचा पराभव झाल्यानं भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे. पण यासाठी विविध मुद्देही कारणीभूत ठरणार आहेत.

Raj Thackeray And Uddhav Thackeray
Rohit Pawar : रोहित पवारांच्या हातून आणखी एका मंत्र्याची होणार शिकार? 5,000 कोटींचा घोटाळा, निवडणुकीत पैसा वापरल्याचा खळबळजनक आरोप

भाजपला खूश होण्यासाठी पाच मुद्दे काय?

  1. यातील सर्वात पहिलं कारण म्हणजे ठाकरे बंधू एकत्र आले तरी काहीही फरक पडणार नाही, हा संदेश राज्यभरात गेला आहे असं भाजपला वाटतं आहे. कारण बेस्ट क्रेडिट सोसायटीमध्ये सत्ता असतानाही ठाकरेंना या निकालामुळं ती गमवावी लागली. त्यामुळं आगामी महापालिका निवडणुकांसाठी काम करताना भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जो संदेश जाणं गरजंचं होतं तो गेल्या असल्याची भाजपची भावना आहे.

  2. त्याचबरोबर एकत्र आल्यानंतर पार पडलेल्या पहिल्याच निवडणुकीत ठाकरे बंधूंना पराभव सहन करावा लागला. यामध्ये उद्धव टाकरेंच्या पॅनलची 9 वर्षांची सत्ता यामुळं गेली. त्यामुळं पहिल्याच परीक्षेत नापास झाल्यानं ठाकरेंचा आत्मविश्वास काही अंशी नक्कीच डळमळीत झालेला असू शकतो.

  3. तसंच भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या नेतृ्त्वातील महायुतीचं पॅनेल जरी या निवडणुकीत पराभूत झालेलं असलं तरी विजयी झालेले शशांक राव हे भाजपचेच सदस्य असल्यानं एक प्रकारे या पतपेढीवर भाजपचंच वर्चस्व निर्माण झालं आहे.

  4. ही निवडणूक अत्यंत छोट्या स्वरुपाची निवडणूक असली तरी मुंबईतल्या लोकांशी जोडल्या गेलेल्या एका महत्वाच्या संस्थेची संबंधीत निवडणूक असल्यानं त्यात मुंबईत प्रचंड प्रभाव असलेल्या ठाकरेंना धक्का बसल्यानं भाजप दोन्ही ठाकरेंना टक्कर देऊ शकते हा विश्वास यातून भाजपनं आपल्या कार्यकर्त्यांना दिला.

  5. राज्यातील आगामी महापालिकेच्या विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपला चांगलाच आत्मविश्वास मिळाला आहे. त्यामुळं आता प्रत्यक्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक भाजप काय कमाल करतंय तसंच ठाकरे बंधु काय कमाल करतात याकडं सर्वांच्या नजरा असतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com