
Bihar election battle heats up : बिहार विधानसभा निडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होवू शकतात. राज्यातील एकूण २४३ जागांवर सर्वच राजीकय पक्षांचे बारीक लक्ष आहे. तर यंदाही सत्ताधारी एनडीए आघाडीने मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पुढे करूनच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर दुसरीकडे राजदचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांनी आपला धाकटा मुलगा तेजस्वी यादव याला इंडिया आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
बिहारमधील विद्यमान नितीश कुमार सरकारचा कार्यकाळ २२ नोव्हेंबर रोजी पूर्ण होणार आहे. हे पाहता सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागू होवू शकते. याच काळात छठ पूजेचा सण होवू घातला असल्याने यानंतर निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील.
भाजप आणि जदयू यांनी अनेकदा बिहार विधानसभा निवडणूक एकत्रित लढवलेली आहे. २०२०मध्येही दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली होती. तेव्हा जदयूने २४५ पैकी ११५ आणि भाजपने ११० जागा लढवल्या होत्या. त्यापैकी ७४ जागांवर भाजपने विजय मिळवली आणि जदयूने ४३ जागा जिंकल्या.
प्राप्त माहितीनुसार एनडीचं जागा वाटप जवळपास निश्चित आहे, लोकसभा निवडणुकीत भाजपने १७, जदयूने १६, एलजेपीने ५ आणि एचएएम व राष्ट्रीय लोक मोर्चाने प्रत्येकी एका जागेवर निवडणूक लढवली होती, तर आथा विधानसभा निवडणुकीतही अशाच प्रकारचा फॉर्म्यूला कायम राहणार असल्याची माहिती आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता एनडीएने चांगलीच कंबर कसली आहे. पंतप्रधान मोदींनी बिहारचे दौरेही वाढवले आहेत. तर भाजपच्या सूत्रांनी या निवडणुकीत नितीश कुमारच एनडीएचा चेहरा राहतील असे सांगितले आहे. तर मोदी २० जून रोजी पुन्हा बिहार दौऱ्यावर येणार आहेत, एकूणच या ठिकाणी एनडीएला मोठ्या विजयाची अपेक्षा आहे. दुसरीकडे विरोधी पक्ष नितीश कुमारांवर टीका करत त्यांचे मानसिक आरोग्य ठीक नसल्याचे सांगत आहेत. शिवाय, प्रशांत किशोर यांनीही त्यांच्या पक्षाची वातावरण निर्मिती केली आहे.
दुसरीकडे महाआघाडीबाबत बोलायचं झालं तर लालूंनी आपला धाकटा मुलगा तेजस्वी यादवला आता मुख्यमंत्री बनवायचंच असा निर्धार केलेला आहे. त्या दृष्टीने अनेकदा पक्षाकडून घोषणाही केली गेली आहे. महाआघाडीत सध्या राजद, काँग्रेस, सीपीआय, विकासशील इन्सान पार्टी, सीपीएम व सीपीआय(एमएल) आदी पक्षांचा समावेश आहे. तर काँग्रेसनेही महाआघाडीत राहूनच निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र ते तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून स्वीकारण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. अशावेळी लालू प्रसाद याव यांची मुत्सदीगिरी किती कामी येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण, त्यांच्यासमोर भाजपचं हिंदुत्ववादी कार्ड, नितीश कुमारांसारखा बलाढ्य अनुभवी नेता आणि काही नव्या पक्षांचेही आव्हान असणार आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.