Sanjay Gaikwad News : कट्टर विरोधक नेत्यांच्या 'होममिनिस्टर' भिडणार

Buldhana Mayor Election: Pooja Gaikwad vs Arpita Vijayraj Shinde:अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत "आम्ही योग्य उमेदवार शोधत आहोत, एखाद्या उच्चशिक्षित ब्राह्मण महिलेला उमेदवारी देण्याचा आमचा विचार सुरू आहे," असे म्हणणाऱ्या गायकवाडांना खूप शोधा शोध करून उमेदवार सापडला आहे.
Buldhana Mayor Election news
Buldhana Mayor Election newsSarkarnama
Published on
Updated on

नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवार (१७ नोव्हेंबर) शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवसापर्यंत बुलढाणा शहरात नगराध्यक्ष पदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नव्हता. मुदत संपण्याच्या शेवटच्या दिवशी अखेरच्या काही तासात सर्वच पक्षांनी आपले पत्ते ओपन केले. शिवसेनेकडून आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा संजय गायकवाड यांचा अर्ज दाखल झाला आहे.

पूजा गायकवाड यांनी अर्ज दाखल करताच संजय गायकवाड यांचे जुने कट्टर विरोधक, परंपरागत राजकीय शत्रु विजयराज शिंदे यांच्या पत्नी अर्पिता शिंदे यांनी भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे बुलढाण्यात या दोन नेत्यांच्या 'होममिनिस्टर'मध्ये सामना रंगणार आहे.

अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत "आम्ही योग्य उमेदवार शोधत आहोत, एखाद्या उच्चशिक्षित ब्राह्मण महिलेला उमेदवारी देण्याचा आमचा विचार सुरू आहे," असे म्हणणाऱ्या गायकवाडांना खूप शोधा शोध करून उमेदवार सापडला आहे.

त्यांनी यांच्या धर्मपत्नी पूजा गायकवाड यांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.अर्ज दाखल करताना संजय गायकवाड उपस्थित होते. तर अर्पिता शिंदे यांच्या अर्ज भरण्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.

Buldhana Mayor Election news
Local Body Election 2025: पक्षाचे तिकीट न मिळालेल्यांना एसटीची हटके ऑफर! दिलीप वळसे पाटलांनाही हसू आवरता आले नाही!

बुलढाणा नगरपालिकेत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण? हा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत होता. संजय गायकवाड कुणाला उमेदवारी देतात याकडे सगळ्याचे लक्ष होते. अखेर गायकवाड यांच्यावर घरातूनच उमेदवार देण्याची वेळ आली आहे, याचे आश्वर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Buldhana Mayor Election news
Nagpur Municipal Election 2025: नव्या आघाड्यामुळे राष्ट्रीय पक्षांची डोकेदुखी वाढणार

संजय गायकवाड विरुद्ध विजयराज शिंदे हे दोन्ही नेते अनेक वेळा एकमेकांच्या विरोधात अनेकदा उभे ठाकले आहेत. आता पहिल्यांदाच त्यांच्या धर्मपत्नी एकमेकींविरोधात मैदानात उतरल्या आहेत. पूजा गायकवाड-अर्पिता शिंदे यांच्यात जोरदार लढत होण्याचा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

दोन्ही नेत्यांच्या नावात 'जय'आहे, निवडणुकीत त्यांच्या 'होममिनिस्टर'चा जय करायचा की पराजय हे बुलढाण्यातील मतदार ठरणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com