मंत्रीमंडळ विस्तारात तरूण तुर्कांना संधी ? 

मंत्रीमंडळ विस्तारात तरूण तुर्कांना संधी ? 

मुंबई : राज्य मंत्री मंडळाच्या विस्तारात तरूण आमदारांना संधी देत तरूण तुर्कांची मोट बांधण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. दिल्लीच्या दौऱ्यावर मुख्यमंत्रींनी संभाव्य नावाची चर्चा पक्षश्रेष्टींशी केली असून मंत्रीमंडळ विस्तारामध्ये आमदार अशिष शेलार, आमदार देवयानी फरांदे, आमदार संजय कुटेंच्या समावेशाची होण्याची शक्‍यता असल्याची माहिती सुत्रांनी दिली. 

गेल्या वर्ष भरापासून राज्यमंत्री मंडळ विस्ताराच्या चर्चने जोर पकडला आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य संधीची वाट बघत मंत्रीमंडळाचा विस्तार लांबवला होता. गेल्या आठवड्यात मुंबईत झालेल्या भाजपच्या महामेळाव्याच्या यशामुळे मुख्यमंत्र्यांनी हाच टाईमींग साधण्याचं ठरवलं आहे. राज्याच्या मंत्री मंडळात नवीन तरूण चेहऱ्यांना संधी देत राज्याच्या राजकारणाचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे समजते. 

या विस्तारात मुंबई भाजपचे अध्यक्ष अशिष शेलार, विदर्भातील भाजपचे जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे, नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे, आमदार योगेश सागर यांचा समावेश होण्याची शक्‍यता असल्याचे सांगितलं जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com