भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांचं निलंबन पाचच मिनिटांत मागे

महाष्ट्रात विधिमंडळ अधिवेशनादरम्यान भाजपचे १२ आमदार निलंबित झाले होते. त्याचीच पुनरावृत्ती छत्तीसगडमध्ये झाली.
Chhattisgarh Revoke Suspension of BJP MLAs

Chhattisgarh Revoke Suspension of BJP MLAs

Sarkarnama

Published on
Updated on

नवी दिल्ली : महाष्ट्रात जुलैमध्ये झालेल्या विधिमंडळ अधिवेशनादरम्यान भाजपचे (BJP) १२ आमदारांना निलंबित आले होते. त्याचीच पुनरावृत्ती काँग्रेसशासित (Congress) छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) झाली. छत्तीसगडमध्ये विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात काल (ता.14) गोंधळ घालणाऱ्या भाजपच्या 11 आमदारांना निलंबित करण्यात आले होते. आज माजी मुख्यमंत्री रमणसिंह (Raman Singh) यांच्यासह 10 आमदारांना निलंबित करण्यात आले. (Chhattisgarh Revoke Suspension of BJP MLAs)

विधानसभा अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही आज गोंधळ कायम राहिला. अन्न पुरवठा मंत्री अमरजीत भगत यांच्या एका विधानाला भाजप सदस्यांनी आक्षेप घेतला. विधानसभा अध्यक्षांनी ते विधान कामकाजातून काढून टाकले. तरीही भाजपच्या सदस्यांचा गोंधळ सुरूच राहिला. ते अध्यक्षांसमोरील वेलमध्ये जाऊन घोषणाबाजी करू लागले. यामुळे माजी मुख्यमंत्री रमणसिंह यांच्यासह भाजपचे 10 आमदार निलंबित झाले.

<div class="paragraphs"><p>Chhattisgarh Revoke Suspension of BJP MLAs</p></div>
आर्यनला अखेर उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

निलंबित सदस्य सभागृहाबाहेर गेल्यानंतर पाचच मिनिटांत विधानसभा अध्यक्ष चरणदास महंत यांनी या सदस्यांचे निलंबन मागे घेतले. यानंतर हे सदस्य सभागृहात पुन्हा दाखल झाले. त्यांना मंत्री अमरजीत भगत यांच्या विभागाशी निगडित कोणताही प्रश्न विचारण्यास मनाई करण्यात आली. सलग दोन दिवसांत भाजपच्या 21 आमदारांचे निलंबन झाले असून, त्यांचे निलंबन मागेही घेण्यात आले आहे.

<div class="paragraphs"><p>Chhattisgarh Revoke Suspension of BJP MLAs</p></div>
वानखेडेंच्या अडचणी वाढल्या! मलिक आता थेट जात पडताळणी समितीत

अधिवेशनात काल प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान भाजपच्या आमदारांनी पंतप्रधान आवास योजनेच्या प्रश्नावर सभागृहात घोषणाबाजी केली. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांना घरांचे वाटप करण्याबाबत भाजप आमदार आक्रमक झाले होते. वारंवार शांततेचे आवाहन करुनही सदस्यांनी गोंधळ कायम ठेवल्याला. यानंतर या आमदारांनी अध्यक्षांसमोर वेलमध्ये उतरुन घोषणाबाजी सुरू केली. यामुळे माजी मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह यांच्यासह 11 भाजप आमदारांचे आपोआप निलंबन झाले. नंतर अध्यक्षांनी त्यांचे निलंबन मागे घेतले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com