आमदार पवारांसह दोघांच्या अपात्रतेच्या दिशेनं काँग्रेसचं पाऊल

देशातील पाच राज्यांमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकांसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली
Ram Singh Kaira and Pritam Singh Pawar
Ram Singh Kaira and Pritam Singh Pawar Sarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकांसाठी भाजपने (BJP) जोरदार तयारी सुरू केली असून इतर पक्षांतील आमदारांना पक्षात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उत्तराखंडमधील (Uttarakhand) अपक्ष आमदार प्रीतमसिंह पवार (Pritam Singh Pawar) आणि रामसिंह कैरा (Ram Singh Kaira) यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. आता या आमदारांच्या अपात्रतेसाठी काँग्रेसने (Congress) पावले उचलली आहेत.

याबाबत काँग्रेस नेते सुरेश नेगी म्हणाले की, आमदार पवार आणि कैरा हे दोघे अपक्ष म्हणून निवडून आले होते. आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी पक्षांतरबंदी कायद्यानुसार राजीनामा द्यायला हवा. त्यांनी भाजपमध्ये केलेला प्रवेश हा घटनेच्या तत्वांचा भंग करणारा आहे. जनतेने दिलेला कौल डावलून ते भाजपसोबत गेले असून, आता त्यांनी राजीनामा द्यावा.

मतदरासंघातील मतदारांनी त्यांनी अपक्ष म्हणून निवडून आले आहे. त्यांनी आता भाजपसोबत जाऊन त्या पक्षाची विचारसरणी स्वीकारली आहे. त्यामुळे ते आता अपक्ष आमदार राहिलेले नाहीत. भाजपनेही ते घटनेचा आदर करीत असतील तर या आमदारांना राजीनामा द्यायला सांगायला हवे, असेही नेगी यांनी सांगितले. या दोघांनी राजीनामा न दिल्यास त्यांना अपात्र ठरवण्याची मागणी काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षांकडे केली जाईल, अशी शक्यता आहे.

Ram Singh Kaira and Pritam Singh Pawar
आर्यनची आजची रात्र तुरूंगातच! नेमकं काय घडलं...

आमदार पवार आणि कैरा यांनी 2017 मध्ये अपक्ष म्हणून विजय मिळवला होता. आमदार पवार हे धनौल्टी मतदारसंघाचे तर आमदार कैरा हे भीमताल मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी अनुक्रमे यावर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला होता. प्रीतमसिंह पवार यांनी उत्तराखंड क्रांती दलातून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती. भाजपच्या मुख्यालयात केंदीय मंत्री स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत पवार यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला.

Ram Singh Kaira and Pritam Singh Pawar
कोरोना लशीसाठी पैसेच नाहीत; मोदी सरकारनं मागितलं 2 अब्ज डॉलरचं कर्ज

निवडणुकीच्या तोंडावर पवार यांच्यासह कैरा यांना आपल्याकडे खेचण्यासाठी काँग्रेसनेही प्रयत्न केले होते. पण त्याआधीच ते भाजपच्या गळाला लागले. उत्तराखंडमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. सत्ता टिकवून ठेवण्यासाठी भाजपकडून प्रयत्नांची पराकाष्टा केली जात आहे. काही महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्रीही बदलण्यात आले होते. काँग्रेसमधील काही आमदारांनाही पक्षात आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com