आर्यनची आजची रात्र तुरूंगातच! नेमकं काय घडलं...

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खानला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी त्याची आजची रात्र तुरुंगातच जाणार आहे.
Aryan Khan
Aryan KhanSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टी (Cruise Drugs case) प्रकरणी आर्यन खानसह (Aryan Khan) मुनमुन धमेचा (Mummun Dhamecha) आणि अरबाझ मर्चंट (Arbaaz Merchant) या तिघांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. परंतु, आर्यनच्या जामिनाचा आदेश सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत आर्थर रोड कारागृहाला मिळाला नाही. यामुळे त्याला आजची रात्र तुरुंगातच काढावी लागणार असून, त्याची उद्या सुटका होणार आहे.

आर्यन खानची आज कारागृहातून सुटका होणार नाही. त्याची उद्या सुटका होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. याबाबत आर्थर रोड कारागृहाचे अधीक्षक नितीन वायचळ वायचळ म्हणाले की, आर्यनच्या जामिनाच्या आदेशाची प्रत आर्थर रोड कारागृहाबाहेरील जामीन पेटीत टाकणे गरजेचे आहे. कारागृ प्रशासनाने यासाठी सायंकाळी 5.35 वाजेपर्यंत वाट पाहिली होती.

आर्यनच्या सुटकेबाबत त्याचे वकील सतिश मानेशिंदे दुपारी म्हणाले होते की, उच्च न्यायालयाकडून आज सायंकाळी जामिनाचा आदेश आम्हाला अपेक्षित आहे. आम्हाला हा आदेश मिळाल्यानंतर तो विशेष एनडीपीएस न्यायालयात सादर केला जाईल. विशेष न्यायालयात प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आर्यनच्या सुटकेचा आदेश आमच्या हाती पडेल. आर्यनची आजच सुटका होणे आम्हाला अपेक्षित आहे.

Aryan Khan
कोरोना लशीसाठी पैसेच नाहीत; मोदी सरकारनं मागितलं 2 अब्ज डॉलरचं कर्ज

अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने (NCB) आर्यनला 3 ऑक्टोबरला पकडले होते. तो 8 ऑक्टोबरपासून आर्थर रोड कारागृहात आहे. आर्यनसह तिघांच्या जामिनावर तीन दिवस उच्च न्यायालयात सुनावणी झाली. आर्यनच्या वतीने माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. रोहतगी हे आर्यनची बाजू मांडणार असल्याचे सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर तीन दिवसांच्या सुनावणीनंतर आर्यनसह तिघांना जामीन मिळाला आहे.

Aryan Khan
राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना विचारला अच्छे दिनचा अँगल!

उच्च न्यायालयात सलग तीन दिवस आर्यनसह तिघांच्या जामिनावर सुनावणी सुरू होती. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नितीन सांबरे यांनी आर्यन, मुनमुन आणि अरबाझ या तिघांना 28 ऑक्टोबरला जामीन मंजूर केला. उच्च न्यायालयाचा जामिनाचा आदेश मिळाल्यानंतर तिघांची कारागृहातून सुटका होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आर्यन आणि अरबाझ हे आर्थर रोड कारागृहात तर मुनमुन भायखळा महिला कारागृहात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com