Mumbai Politics News : ठाकरेंच्या खेळीला काँग्रेसचे चोख उत्तर; थेट मुंबईचा अध्यक्षच बदलला अन्...

Uddhav Thackeray, Prakash Ambedkar News : काँग्रेसने मुंबई अध्यक्ष पदावर माजी मंत्री वर्षा गायकवाड यांची नियुक्ती केली आहे.
Uddhav Thackeray, Prakash Ambedkar, Varsha Gaikwad News
Uddhav Thackeray, Prakash Ambedkar, Varsha Gaikwad NewsSarkarnama
Published on
Updated on

Varsha Gaikwad News : आगामी मुंबई महानगरपालिका आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मुंबई अध्यक्ष पदावर माजी मंत्री वर्षा गायकवाड यांची नियुक्ती केली आहे. महिलेला अध्यक्ष पद देत काँग्रेसने मोठी खेळी केली आहे. माजी अध्यक्ष भाई जगताप यांना पक्षाने तडकाफडकी हटवले आहे. मात्र, काँग्रेसच्या या खेळीमुळे ठाकरे गटाला शह मिळाला असल्याचे बोलेल जात आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची तयारी भाजप आणि ठाकरे गटाने जोरदारपणे चालवली आहे. त्यातच आता काँग्रेसनेही तयारी सुरु केली आहे. त्यामुळे काँग्रेसने (Congress) मुंबईच्या अध्यक्षपदी दलित नेत्या असलेल्या गायकवाड यांची नियुक्ती केली. तसेच धारावीमध्ये गायकवाड यांचा जनसंपर्क मोठा आहे. त्याचा फायदा त्यांना झाल्याचे सांगितले जात आहे.

Uddhav Thackeray, Prakash Ambedkar, Varsha Gaikwad News
Maharashtra politics : भाजपचे टार्गेट उद्धव ठाकरेच; अमित शाहांच्या भाषणात १० पेक्षा जास्त वेळा उल्लेख अन्...

उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची युती झाली आहे. त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईमधून निवडणूक लढावी, यासाठी ठाकरे गटाकडून गळ घातली जात असल्याची चर्चा आहे. मुंबई महापालिका ही ठाकरे यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे आंबेडकरांना सोबत घेत शिवशक्ती आणि भिमशक्तीचा प्रयोग केला. प्रकाश आंबेडकर मुंबईतून लढले तर दलित मत मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे वळतील. यामुळे काँग्रेसला फटका बसू शकतो.

आंबेडकर आणि ठाकरेंच्या खेळीमुळे दलित मते त्यांच्याकडे वळली जाऊ शकतात. त्यामुळे आपला पारंपरिक मतदार पक्षापासून दूर जाऊ शकतो. तसेच उद्या मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढण्याचे आघाडीने ठरवले तर आपली बार्गेनिंग पॉवर कमी होईल, अशी भिती काँग्रेसला असावी, त्यामुळे काँग्रेसने ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आंबेडकरांच्या खेळीला गायकवाड यांच्या नियुक्तीने चोख प्रतिउत्तर दिले आहे.

Uddhav Thackeray, Prakash Ambedkar, Varsha Gaikwad News
Karjat Bajar Samiti News : राम शिंदेंची जादू चालली; रोहित पवारांचा सदस्य फुटला?

वर्षा गायकवाड ह्या मुंबईतील धारावी मतदार संघातून निवडून येतात. त्यांना मुंबईतील भौगोलिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा अभ्यास आहे. गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड हे मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष होते. त्या कार्यकाळात वर्षा गायकवाड या आमदार आणि मंत्री देखील राहिलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना आगामी महानगरपालिकेत काँग्रेसला यश मिळवून देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये वर्षा गायकवाड यांना शिवसेना शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधात उमेदवारी देण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे. वर्षा गायकवाड यांचे या विभागात चांगले काम आहे. त्यामुळे काँग्रेसने त्यांना अध्यक्षपद दिल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com