Karjat Bajar Samiti News : राम शिंदेंची जादू चालली; रोहित पवारांचा सदस्य फुटला?

Ahmadnagar Politics : जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या कर्जत बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक आज पार पडली.
Ram Shinde VS Rohit Pawar
Ram Shinde VS Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Rohit Pawar, Ram Shinde News : जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या कर्जत बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक आज पार पडली. या निवडणुकीत आमदार राम शिंदे यांचे गटाचे नऊ सदस्य तर आमदार रोहित पवार गटाचे नऊ सदस्य, अशी समसमान संख्या असतानाही राम शिंदे गटाचे सभापती आणि उपसभापती विजयी झाले.

कर्जत बाजार समितीच्या (Karjat Bajar Samiti) सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून होते. मात्र, यात आमदार राम शिंदे यांनी बाजी मारली आहे. शिंदे गटाचे सभापती पदाचे उमेदवार काकासाहेब तापकीर यांना नऊ मते मिळाली. तर रोहित पवार गटाचे सभापती पदाचे उमेदवार यांना आठ मते मिळाल्याने ते पराभूत झाले, एक मत अवैध ठरल्याचे निवडणूक प्रक्रियेत दिसून आले.

Ram Shinde VS Rohit Pawar
Supriya Sule : राष्ट्रवादीच्या नवनियुक्त कार्यकारी अध्यक्षा सुळे कुणाला रिपोर्टिंग करणार ? ; सुळे म्हणाल्या..

उपसभापती पदाच्या निवडणुकीत शिंदे गटाचे पाटील अभय पांडुरंग यांना दहा मते मिळाली त्यामुळे ते विजयी झाले. तर रोहित पवार गटाचे उमेदवार श्रीहरी कैलास शेवाळे यांना आठ मते मिळाल्याने ते दोन मतांनी पराभूत झाले. यामुळे पवार यांच्या गटाचे एक मत फुटल्याचे स्पष्ट होत आहे. सभापती पदाच्या मतदान प्रक्रियेनंतर एक मत बाद झाल्याचे स्पष्ट झाले. रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या गटाचे नऊ सदस्य असतानाही आठच मते मिळाल्याने पवार गटाचा सदस्य फुटल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.

Ram Shinde VS Rohit Pawar
Ajit Pawar News : नाराजीच्या चर्चांवर अजित दादांनी थेट दिल्लीतील घटनाक्रमच सांगितला

दरम्यान, राम शिंदे (Ram Shinde) यांनी जामखेड पाठोपाठ कर्जत मधील ही बाजार समिती आपल्या ताब्यामध्ये घेत रोहित पवार यांना धोबीपछाड दिली आहे. जामखेड बाजार समिती निवडणुकीत राम शिंदे व रोहित पवार यांच्या दोन्ही पॅनलचे नऊ-नऊ सदस्य निवडून आले होते. त्यावेळी झालेल्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीत ईश्वर चिट्ठीच्या आधारे निर्णय घेण्यात आला. त्यात शिंदे गटाचे उमेदवार हे सभापती पदी निवडून आले. त्यानंतर आज कर्जत बाजार समितीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा शिंदे यांनी मतांच्या गणितात बाजी मारत पवार यांना धक्का दिल्याचे बोलले जात आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com