Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama

Rohit Pawar : 'तुम्ही पण काचेच्या घरात राहता, विसरू नका'; रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांना इशारा

MLA Rohit Pawar warning to the rulers : कारखाने आणि कंपन्यांची चौकशी राजकीय दृष्टिकोन ठेवून होत असल्याने आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला.
Published on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे कारखाने आणि कंपन्यांची चौकशी सुरू आहे. मध्यंतरी 'ईडी'ने देखील कारवाई केली होती. यावरून आमदार पवार यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे.

'राजकीय दृष्टिकोन ठेवून कारवाई केल्या, तर आपण देखील काचेच्या घरात राहतो, हे विसरू नये', असा इशारा दिला आहे. तसंच मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्यावर निशाणा साधताना स्वतःच्या मुलीला पाण्यात बुडवण्याची भाषा करता, यावरून विचारधारा कळते. आम्ही कोणाचेही घर फोडले नाही, असं आमदार पवारांनी म्हटलं.

आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी त्यांच्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात स्वाभिमान यात्रा काढली आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन तिथं ग्रामदैवताची स्वच्छता करणार आहे. या स्वाभिमान यात्रेची सुरवात सिद्धटेक येथील गणेश मंदिरात पूजा करून करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या घटेनवरून रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली.

Rohit Pawar
Radhakrishna Vikhe : फडणवीसांचं कौतुक, तर पवारांना टोला; मंत्री विखेंनी गणरायाकडं नेमकं काय मागितलं?

आमदार रोहित पवार यांच्याशी निगडीत असलेल्या कंपन्या आणि कारखान्यांची चौकशी सुरू आहे. या चौकशीसंदर्भात आमदार रोहित पवार यांनी मोठं भाष्य केले. 'राजकीय दृष्टिकोन ठेवून कोणी चौकशी करत असेल, तर आपण देखील काचेच्या घरात राहता, हे विसरू नका. त्यांचे पुस्तक माझ्याकडे तयार आहे', असा इशारा रोहित पवार यांनी दिला.

Rohit Pawar
Ahmednagar BJP Politics : 'नगरी' ग्राऊंडवर गुजरातची 'फिल्डिंग'; भाजपचा 'पॅर्टन' ठरणार का यशस्वी?

मंत्री आत्राम यांची मानसिकता आणि विचारधारा समोर आली

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्यावर देखील आमदार पवार यांनी जोरदार टीका केली. आम्ही कोणाची घरं फोडली नाहीत, असे म्हणत पोटच्या मुलीला पाण्यात बुडवण्याची भाषा करतो, यावरून त्यांची मानसिकता आणि विचारधारा लक्षात येते.

मंत्री आत्राम यांची मुलगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात येणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. यामुळे धर्मराव बाबा आत्राम यांनी मुलीवर जोरदार टीका केली होती. तसंच घर फोडण्याचा आरोप पवारांवर केला होता. त्याला आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com