बड्या नेत्याचा आमदारकीच्या राजीनाम्याचा डाव अन् त्यावर काँग्रेसनं टाकला प्रतिडाव

मणिपूरपमध्ये या वर्षी विधानसभेची निवडणूक (Assembly Election) होत आहे. या निवडणुकीआधी काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला होता.
Congress

Congress

Sarkarnama

नवी दिल्ली : मणिपूरपमध्ये (Manipur) यावर्षी विधानसभेची निवडणूक (Assembly Election) होत आहे. या निवडणुकीआधी काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे नेते डी.कोरूंगथांग (D. Korungthang) यांनी आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने 24 तासांतच त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत तडकाफडकी निलंबित केले आहे.

काँग्रेसचे मणिपूर प्रभारी भक्त चरणदास यांनी कोरुंगथांग यांना पत्र पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, मागील काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून तुमच्याबाबत अहवाल मिळत आहे. तुम्ही पक्षविरोधी कारवाया करीत असल्याचे समोर आले आहे. सुमारे महिनाभरापासून तुम्ही हा प्रकार करीत आहात. तुमच्या पक्षविरोधी कारवायांचे पुरावेही आमच्याकडे आहेत. त्यामुळे तुम्हाला तातडीने पक्षाच्या कार्याध्यक्षपदावरून हटवले जात आहे. याचबरोबर तुम्हाला पक्षातून निलंबित करण्यात येत आहे.

<div class="paragraphs"><p>Congress</p></div>
कार्यकारिणीत डावललं जाताच भाजप आमदाराचा थेट बंडाचा पवित्रा

मणिपूरमध्ये (Manipur) सध्या भाजपची (BJP) सत्ता आहे. आगामी निवडणुकीत बहुमत मिळवण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. माजी मुख्यमंत्र्यांच्या आमदार मुलासह दोन आमदारांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे नेते राजकुमार इमो सिंह आणि यामथाँग हाओकिप यांना पक्षात आणून भाजपने आघाडी घेतली होती. सिंह हे मणिपूरमधील प्रसिध्द राजकीय कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील राजकुमार जयचंद्र सिंह हे मणिपूरचे मुख्यमंत्री होते. तसेच राज्यातील पहिले केंद्रीय मंत्री म्हणूनही त्यांचा लौकिक आहे.

<div class="paragraphs"><p>Congress</p></div>
देशात ओमिक्रॉनने घेतला पहिला बळी!

चालू वर्षात 7 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. या वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये गोवा, मणिपूर, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये हिमाचल प्रदेश तर डिसेंबरमध्ये गुजरातमध्ये निवडणूक होत आहे. यातील पंजाब वगळता इतर 6 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. यातील वर्षाच्या सुरवातीला उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यांतील विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळून लावली होती. निवडणुका नियोजित वेळापत्रकानुसारच घेण्याच आयोगाने जाहीर केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com