Congress News : काँग्रेसने कर्नाटकात वापरलेला फॉर्म्युला, मध्य प्रदेश, राजस्थान अन् छत्तीसगडमध्येही ठरणार गेम चेंजर?

Mallikarjun Kharge News : काँग्रेसने आता मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानकडे लक्ष वळवले आहे.
Mallikarjun Kharge News
Mallikarjun Kharge News Sarkarnama
Published on
Updated on

Karnataka Assembly Elections News : काँग्रेसने कर्नाटमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे. त्यानंतर त्यांनी लगेचच आता मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानकडे लक्ष वळवले आहे. कर्नाटकातील विजयाने पक्षाच्या आपेक्षा आणि कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले आहे. त्यामुळे आता कर्नाटक प्रमाणेच रणनीती वापत इतर राज्यातही काँग्रेस आघाडी घेणार आहे.

भाजप कोणत्याही राज्याच्या निवडणुकीची तयारी किमान सहा महिने आधी सुरु करतो. त्याच पद्धतीने काँग्रेसनेही कर्नाटकमध्ये निवडणुकीची तयारी नऊ महिने आधीच सुरु केली होती. नऊ महिन्यांपूर्वीच काँग्रेसने कर्नाटकमध्ये वॉररुम तयार केली होती. या माध्यमातून कार्यकर्त्यांना प्रशिक्षण तसेच 'पे सीएम मोहिम' आणि भाजपच्या प्रचाराला उत्तर न देण्याची रणनीती, स्थानिक मुद्यांवर भर असा कार्यक्रम काँग्रेसने राबवला होता.

Mallikarjun Kharge News
Rahul Narvekar Returned To Mumbai: मुंबईत पाय ठेवताच राहुल नार्वेकरांनी वाढवले ठाकरेंचे टेन्शन; भरत गोगावलेंच्या नियुक्तीवर म्हणाले...

त्याच पद्धतीने आता काँग्रेस (Congress) इतर तीन राज्यामध्येही हीच मोहिम राबवणार आहे. त्यासाठी पक्षाने लगेच तयारी सुरु केल्याची माहीती आहे. नोव्हेंबर-डिंसेंबरमध्ये राजस्थान (Rajasthan) आणि छत्तीसगडमध्ये निवडणुका आहेत. येथे काँग्रेसला सत्ता टिकवण्याचे आव्हान आहे. तर मध्य प्रदेशमध्ये सत्ता खेचून आणायची आहे. मध्य प्रदेमध्ये काँग्रेस जिंकली होती. मात्र, ज्योतिरादित्य शिंदे यांच्यामुळे सरकार पडले. कर्नाटकमध्ये ज्या पद्धतीने काँग्रेसने ऑपरेशन लोटसचा प्रचार केला तसाच प्रचार मध्य प्रदेशातही करण्यात येणार आहे.

Mallikarjun Kharge News
Rahul Narvekar Latest News : राहुल नार्वेकर सर्वप्रथम घेणार 'हा' निर्णय; ठाकरे गटाच्या मागणीवर म्हणाले...

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्येही स्थानिक रणनीती, सकारात्मक प्रचार, मोफत भेटवस्तू, तिकिटांचे लवकर वाटप आणि काँग्रेसच्या विचारधारेवर भर, या प्रमुख वैशिष्यांचा समावेश आहे. या वैशिष्यांच्या बळावर काँग्रेस कर्नाटमध्ये उतरली होती. काँग्रेस अनेक बदल करत असल्याचे दिसत आहे. कर्नाटच्या विजयानंतर सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी, सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार, अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge), रणदीप सुरजेवाला या नेत्यांचे फोटो शेअर करणे टाळले. काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये खर्गेंना सर्व अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे पक्षावर अध्यक्षांची छाप पडत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com