Devendra Fadnavis News : फडणवीसांची 'ती' क्लिप विरोधकांनी हुशारीने वापरली अन् केला 'करेक्ट' कार्यक्रम

Old Pension Scheme : जुन्या पेंशन योजनेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की..
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama

Maharashtra Politics : राज्याची अर्थिक स्थिती पाहता राज्य सरकारला जुन्या पेंशन योजनेची अंमलबजावणी करणे शक्य नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमात स्पष्ट केले होते.

त्यानंतर राज्यात पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणूक जाहीर झाली. निवडणुकीच्या काळात जुन्या पेंशन योजनेचा विचार करण्यात येईल, अशी सोयीची भूमिकादेखील उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली होती.

मात्र, विरोधकांनी फडणवीस यांच्या आधीच्या भाषणातील केवळ वीस सेकंदांच्या जुन्या क्लिपचा पुरेपूर वापर केला. त्याचा फटका नागपूर शिक्षक मतदारसंघातील उमेदवार नागो गाणार यांना बसला. जुनी पेंशन योजना जे सरकार देणार नाही. त्यांना मत का द्यायचे, असा मुद्दा करून त्यावर विरोधकांनी मते मिळविली.

Devendra Fadnavis
Gopichand Padalkar On Ajit Pawar : ''एखादा विजय मिळाला म्हणून...''; पडळकरांनी अजित पवारांना पुन्हा डिवचलं

जुन्या पेंशन योजनेबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका स्पष्ट आहे. उत्तम प्रशासक असल्याने त्यांना या विषयाची चांगली जाण आहे. त्यामुळे या विषयावर राजकारण न करता पेंशन योजनेबाबत राज्यातल्या जनतेला स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी वेळोवेळी केला आहे.

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या आणि त्यांना द्यावी लागणारी जुनी पेंशन याचा विचार केला तर राज्याच्या तिजोरीवर इतका भार पडेल की राज्य चालविणे मुश्‍किल होईल, याची नेमकी जाण फडणवीस यांना आहे. आधीच्या सरकारमधील अर्थमंत्री अजित पवार यांनीदेखील जुनी पेंशन योजना शक्य नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते.

Devendra Fadnavis
Nana Patole News: नाना पटोलेंवर चंद्रकांतदादा बरसले; म्हणाले, 'तुम्ही तर आमच्या उद्धवजींना पळवले..'

गाणार यांच्या पराभवाची विविध कारणे सांगितली जात आहेत. बाद झालेली मते हेदेखील एक कारण सांगण्यात येत आहे. नागपूर भाजपातील अंतर्गत गटबाजी हे दुसरे कारण सांगितले जात आहे. ही दोन्ही कारणे असतीलही. मात्र, पेंशन योजनेचा विरोधकांनी केलेला मुद्दा आणि आडबालेंना कॉंग्रेसमधील सर्व गटांचा मिळालेला पाठिंबा त्यांना विजयापर्यंत घेऊन गेला हे निश्‍चित.

Devendra Fadnavis
Amravati : नवीन चेहरा असलेले धीरज लिंगाडे आमदार झाले, त्याची ‘ही’ आहेत कारणे...

विधान परिषदेच्या दोन व शिक्षक मतदारसंघाच्या तीन अशा पाच जागांवर निवडणूक झाली. मात्र, कोकण वगळता भाजपाला यश मिळविता आले नाही. अर्थात कोकणातील ज्ञानेश्‍वर म्हात्रे हे उमेदवारदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या प्रयत्नांनी ऐनवेळी भाजपात आले. इतर सर्व ठिकाणी भाजपाचा सपशेल पराभव झाला.

मोठे नेटवर्क आणि कोणतीही निवडणूक अंत्यंत तयारीने आणि तडफेने लढणाऱ्या भाजपाला या निवडणुकीत यातील काहीच करता आले नाही, हे पटण्यासारखे नाही. नाशिक पदवीधरमध्ये सत्यजीत तांबेंचा विजय झाला असला तरी त्यात भाजपाचा फार वाटा नाही. भाजपाने मदत केली नसती तरी तांबे निवडून आलेच असते. फारतर मताधिक्य आणखी कमी झाले असते इतकेच.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com