Congress Vs BJP News : आमचे घर फोडल्यामुळेच भाजपला निवडणुकीत पराभव पत्करावा लागला, असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केले होते. आता पटोले यांच्या याच वक्तव्याचा समाचार घेत भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पाटील म्हणाले, "काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचीच घर फोडण्याची मोठी परंपरा आहे. यावर पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका मांडणार आहे, असे पाटील यांनी आव्हान दिले आहे. "
पाटील पुढे म्हणाले, "सत्तेचा दुरुपयोग कोणी केला, जनतेचा विश्वास घात कोणी केला. उद्धव ठाकरे यांची सेना रोज रोज गद्दारी केली असं म्हणत आहे. मग तुम्ही २०१९ च्या वेळी काय केले होते? तुम्ही गद्दारीच केली होती ना." असे पाटलांनी सुनावले आहे.
"राष्ट्रवादी काँग्रेस म्हणत आहे की, आम्ही यांची माणसं पळवली होती. पण तुम्ही तर आमच्या उद्धवजींना पळवलं. उद्धवजी आणि आमचं फार गुण्यागोविंदानेच सगळं चाललं होतं. तुम्ही उद्धजींना फितवलंत, त्यांना पळवून नेलं, अशा शब्दात त्यांनी नाना पटोलेंना सुनावले आहे.
आम्ही सगळे सहनशील आहोत, याचा अर्थ आम्ही भित्रे नाही. घरे कोणी कोणाची फोडत आले, जनतेशी गद्दारी कोणी केव्हा केली, पाठीत खंजीर कोणी खुपसला? यावर एक वेगळी पत्रकार परिषद घेण्याची आपली इच्छा असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.