Barshi Politics : राजेंद्र राऊतांचा धडाका, तर दिलीप सोपलांच्या गोटात शांतता; बार्शीच्या राजकारणात नेमकं घडतंय काय?

Rajendra Raut Vs Dilip Sopal : बार्शीत राज्याचा नव्हे तर स्थानिकांच्या मनातील कल जणावा लागतो
Dilip Sopal, Rajendra Raut
Dilip Sopal, Rajendra RautSarkarnama
Published on
Updated on

राजेंद्र खराडे

Barshi Political News : राज्याच्या राजकारणात पक्ष प्रवेश आणि गटबाजी यावरच सर्वकाही अवलंबून आहे. राजकीय व्यक्तीचे महत्त्व हे त्या पक्षावरून ठरवले जाते. सोलापुरातील बार्शी विधानसभा मतदारसंघाचे गणित मात्र वेगळे आहे. येथे पक्षाला नाहीतर व्यक्तीला अधिकचे महत्त्व असते, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे पक्षाचे पाठबळ असू की, नसू तर बार्शीकरांच्या मनाचा अचूक अंदाज घेणारा नेता येथे सरस ठरत आला आहे. विधानसभेसाठी डझनभर नेतेमंडळी निवडणुकीच्या रिंगणात असली तरी मतदारसंघाचे नेतृत्व हे दिलीप सोपल किंवा राजेंद्र राऊत यांच्याकडेच राहिलेले आहे. सध्या तालुक्याचे प्रतिनिधित्व राऊत करीत आहेत. (Latest Political News)

राऊत २०१९ च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. आगामी काळातील निवडणुका पाहता त्यांनी विकासकामांचा धडाका लावला आहे. दुसरीकडे संयमी आणि मुरब्बी राजकारणी म्हणून राज्यभर ख्याती असलेले दिलीप सोपल (Dilip Sopal) यांच्या गटात मात्र कमालीची शांतता आहे. माजी मंत्री दिलीप सोपल हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत आहेत. मात्र, सध्याची राजकीय स्थिती पाहता सोपलांच्या मनात नेमके काय सुरू आहे, असा प्रश्न बार्शीकरांना पडलेला आहे. त्यामुळे सोपल हे ऐनवेळीच आपल्या राजकीय डावाचे पत्ते उघड करणार असतील, तर ही वादळापूर्वीची शांतता असल्याचेही बोलले जात आहे.

Dilip Sopal, Rajendra Raut
Maharashtra Vs Karnataka : 'अलमट्टी'वरून महाराष्ट्र-कर्नाटक वाद पेटणार? सांगली, कोल्हापूरला धोक्याची घंटा

तालुक्याच्या राजकारणावर सोपल आणि राऊत या दोन गटांचाच प्रभाव राहिलेला आहे. यासाठी दोघांनीही स्थानिक पातळीवरील राजकीय नेत्यांची साथ घेतली खरी, पण प्रतिनिधित्व हे आपल्याकडेच ठेवले. माजी मंत्री दिलीप सोपल यांनी आतापर्यंत ३० वर्षे तालुक्याचे नेतृत्व केले. कधी अपक्ष तर कधी पक्षाच्या चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवली असली तरी शरद पवारांचे विश्वासू अशी त्यांची ओळख झालेली आहे.

राज्यातील बदलती राजकीय समीकरणे पाहता त्यांनी २०१९ च्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेमध्ये प्रवेश करून यामधूनच निवडणूक लढवली होती. मात्र, शिवसेना आणि भाजपची युती असतानाही सोपलांना पराभव स्वीकारावा लागला, तर दुसरीकडे आक्रमक स्वभाव, ग्रामीण भागात कार्यकर्त्यांचे जाळे आणि तरुणांचे आकर्षण असलेल्या राजेंद्र राऊत यांना अपक्ष असतानाही मतदारांनी झुकते माप दिले. तर राष्ट्रवादीकडून ऐनवेळी वैरागचे निरंजन भूमकर यांना संधी देण्यात आली होती. राजेंद्र राऊत हे अपक्ष म्हणून निवडून आले असले तरी ते भाजप पुरस्कृत आमदार हे आता उघड आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकारची स्थापना होताच मतदारसंघाच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी आणण्यामध्ये राऊत यांना यश मिळाले आहे.

Dilip Sopal, Rajendra Raut
Jitendra Awhad Vs Anna Hajare : माझ्या ट्विटमुळे अण्णांना जाग आली; अब्रुनुकसानीच्या दाव्याला न जुमानता आव्हाडांचा पुन्हा निशाणा...

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते लोकसभापर्यंतच्या निवडणुका होणार आहेत. धाराशिव लोकसभा मतदारसंघात बार्शीचा समावेश असल्याने सोपल आणि राऊत यांची भूमिका महत्त्वाची ठरते. राज्याच्या राजकारणात नेतेमंडळीचे पक्षातून आउटगोइंग आणि इनकमिंग सुरू असले तरी सोपल यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. ऐनवेळी ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमधूनही निवडणूक लढवू शकतात, अशीही मतदारसंघात चर्चा सुरू आहे. (Maharashtra Political News)

दरम्यान, विश्वास बारबोले यांनी राऊत गटापासून दूर होत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शहरासह ग्रामीण भागातील मतदारांवर बारबोले कुटुंबीयांचा कायम प्रभाव आहे. त्यामुळे विश्वास बारबोले यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली तर नुकसान सोपलांचे की राऊतांचे होणार याकडेही बार्शीकरांचे लक्ष आहे, तर वैराग भागात निरंजन भूमकर यांचा प्रभाव वाढत आहे. शिवसेनेशी एकनिष्ठ असलेले भाऊसाहेब आंधळकर यांनीही मध्यंतरी शिंदे गटात प्रवेश केला आहे. एवढेच नाहीतर शिंदे गट म्हणजेच खरी शिवसेना असे म्हणत येथील जागेवर त्यांनी दावा केला आहे.

बार्शीचे राजकारण सध्यातरी आरोप-प्रत्यारोप इथपर्यंत मर्यादित असले तरी शहराचा सर्वांगीण विकास, एमआयडीसी, उपसा सिंचन योजनेचे पाणी या मुद्द्यांवरच आगामी निवडणुकीचे चित्र असणार आहे. सध्या आमदार राजेंद्र राऊतांच्या माध्यमातून विकासकामांचा धडाका सुरू असला तरी सोपलांच्या गोटात मात्र शांतता आहे. त्यामुळे व्यक्तिकेंद्रित समजल्या जाणाऱ्या बार्शी तालुक्याचे नेतृत्व कुणाकडे जाणार, हे तर येणारा काळच ठरवणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Dilip Sopal, Rajendra Raut
Thackeray Group News : यमाच्या रेड्यावर मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री बसून मौजा मारीत आहेत; ठाकरे गटाची चौफेर टीका

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com