धर्मा पाटील प्रकरणी चौकशीसाठी न्या. दर्णे चौकशी करणार 

धर्मा पाटील प्रकरणी चौकशीसाठी न्या. दर्णे चौकशी करणार 

मुंबई : भूसंपादित झालेल्या जमिनीचा योग्य मोबदली न मिळाल्याने वयोवृद्ध शेतकरी 
धर्मा पाटील यांनी मंत्रालयात आत्महत्या केली होती. यामुळे राज्य सरकारवर जोरदार टीका झाली होती. धर्मा पाटलांच्या प्रकरणाची चौकशीसाठी माजी प्रधान जिल्हा न्यायाधीश शाम दर्णें यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

धुळे जिल्ह्यातील महानिर्मिती कंपनीच्या दौंड आईची प्रकल्पाचा दोंडाईचा ऊर्जा प्रकल्पासाठी मौजे विखरण तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथील काही शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली होती त्यातीलच जमीन संपादित झालेले धर्मा पाटील यांना जमिनीचा योग्य मोबदला का मिळाला नाही ? याची चौकशी माजी प्रधान जिल्हा न्यायाधीश शाम दर्णें यांची नियुक्ती करण्यात येत आली. यासाठी त्यानंतर प्रतिमहा दोन लाख रूपये मानधन देण्यात येणार असल्याचा शासन निर्णय प्रसिध्द करण्यात आला आहे. 

धर्मा पाटील हे शेतकरी सिंदखेडराजा येथील रहिवासी होते. औष्णिक प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीला अल्प मोबदला मिळाल्याने त्यांनी सोमवारी दि. 22 जानेवारी 2018 रोजी मंत्रालयात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. धर्मा पाटील यांची पाच एकर जमीन औष्णिक प्रकल्पासाठी संपादित झाली आहे. जमिनीचा पाचपट मोबदला देण्याचे सरकारचे धोरण असताना पाच एकरसाठी केवळ चार लाख रुपये मोबदला त्यांना देण्यात आले आहे. 

वाढीव मोबदला मिळावा यासाठी पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात खेटे मारत होते. तिथे काहीच दाद न मिळाल्याने त्यांनी मंत्रालय गाठले होते. मात्र मंत्रालयात फेऱ्या मारूनही काम होत नाही हे पाहून निराश झालेल्या धर्मा पाटील यांन विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com