Kolhapur-Satara Politics: राष्ट्रवादीतील फुटीमुळे कोल्हापूर, सातारा लोकसभा मतदारसंघाची समीकरणं बदलणार?

Maharashtra Politics : राज्यात बदललेल्या समीकरणामुळे आगामी निवडणुकीत मतदारसंघ बदलाच्या हालचालीची शक्यता
Kolhapur-Satara Politics
Kolhapur-Satara PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलत असून काँग्रेसचा आत्मविश्वास वाढल्याचे चित्र आहे. या बदललेल्या समीकरणामुळे आगामी निवडणुकीत काही ठिकाणी मतदारसंघ बदलाच्या हालचाली होऊ शकतात.

त्यामध्ये कोल्हापूर आणि सातारा हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) वाट्याचे लोकसभा मतदारसंघ काँग्रेस मागण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दोन्ही मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा काँग्रेसची ताकद सध्याच्या परिस्थितीत जास्त असल्याचे बोलले असल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत या दोन मतदारसंघाची समीकरणं बदलू शकतात.

राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट, काँग्रेस, महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपला रोखण्यासाठी आखणी करत असतानाच राष्ट्रवादीमध्ये पडलेली फूट हा आघाडीसाठी मोठा धक्का आहे. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस आणि ठाकरे गट भाजपला रोखण्याठी आणखी काय रणनीती आखतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Kolhapur-Satara Politics
Mira Bhayandar Commissioner: मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय 'मीरा भाईंदर'चे आयुक्त ढोलेंची तडकाफडकी बदली ; काटकर नवे आयुक्त

सध्या महाविकास आघाडीत संख्याबळाचा विचार केल्यास काँग्रेस मोठा पक्ष ठरत असून काँग्रेसनेही पक्षांतर्गत बांधणी करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेसला विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद मिळाल्याने राज्यात पक्ष संघटना आणखी मजबूत करण्यासाठी आणि सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवण्यासाठी तसेच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सरकारपर्यंत पोहचविण्साठी काँग्रेससाठी मोठी संधी आहे. त्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात हसन मुश्रीफ हे अजितदादांसोबत गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडे (शरद पवार गट) दमदार चेहरा सध्या तरी नाही. त्यातच कोल्हापूर जिल्ह्यात माजी मंत्री सतेज पाटील यांनी काँग्रेसची मोठ्या प्रमाणात बांधणी केली असून हा मतदारसंघ काँग्रेसला मिळाल्यास चांगली लढत होईल.

Kolhapur-Satara Politics
Satej Patil On Kesarkar : पर्यटनासाठी पालकमंत्री कोल्हापुरात येतात; केसरकरांच्या 'होम पिच'वरून पाटलांचा टोला!

दुसरीकडे सातारा लोकसभा मतदारसंघात वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडली. कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील हे शरद पवारांच्या सोबत राहिले. मात्र, एकूण लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कमी झाली आहे.

त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी आघाडीकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची उमेदवारी दिल्यास आश्चर्य वाटणार नाही. या दोन्ही मतदारसंघात आतापर्यंत मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसला साथ दिलेली आहे. मात्र, आता अनेक नेते भाजपबरोबर गेल्याने या जागा टिकवण्यासाठी महाविकास आघाडी असे प्रयोग करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com