Satej Patil On Kesarkar : पर्यटनासाठी पालकमंत्री कोल्हापुरात येतात; केसरकरांच्या 'होम पिच'वरून पाटलांचा टोला!

Satej Patil On Deepak Kesarkar : "चुकीच्या प्रवृत्तीला रोखण्यासाठी जे काही करावं लागेल.."
Satej Patil On Kesarkar :
Satej Patil On Kesarkar :Sarkarnama

Kokan News : काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी सावंतवाडीत दाखल झालेले आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापुरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर जोरदार टीका केली, केसरकर हे पर्यटनासाठी कोल्हापुरमध्ये येत असतात, अशा शब्दात त्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

Satej Patil On Kesarkar :
Raghunathdada Patil On Bachchu Kadu: आम्ही त्यांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केले, ते राज्यमंत्रीच राहिले; त्यांनी त्यांची किंमत..

सावंतवाडी येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सतेज पाटील यांनी मार्गदर्शन केले. पक्ष वाढीसाठी आगामी काळात काय नियोजन केले पाहिजे, याबाबत सूचना दिल्या. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना सतेज पाटील यांनी केसरकर यांच्याबाबत मित्र पक्ष असणाऱ्या भाजपाचेच पदाधिकारी नाराज आहेत, केसरकर कोल्हापूरला कमी वेळ देतात, असा आरोप केला.

सतेज पाटील यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार इंडियाबरोबरच राहणार आहेत, ते पूर्ण ताकदीने भाजपाला रोखण्यासाठी काम करत आहेत. काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कमकुवत वाटत असली तरी काँग्रेसच्या विचारांचे कार्यकर्ते या विभागात मोठ्या प्रमाणात आहेत. पुढील निवडणुकींमध्ये काँग्रेसला चांगले दिवस येतील. पक्ष वाढीसाठी पुढच्या काळात मोठ्या प्रमाणात उपक्रम राबवले जाणार आहेत, असं पाटील यांनी सांगितलं.

Satej Patil On Kesarkar :
Sanjay Raut On Flying Kiss : राहुल गांधींनी 'फ्लाईंग किस' दिला तर त्यात काय झालं? राऊतांनी केलं समर्थन !

राज्यातील काँग्रेस एकसंघ आहे. कुणीही कुठे जाणार नाही. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र वावरत आहोत. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळेल. देशात असलेल्या चुकीच्या प्रवृत्तीला रोखण्यासाठी जे काही करावं लागेल, ते आम्ही करणार आहोत, असही सतेज पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com